जिल्हा पंचायत निवडणुकीत जास्तीतजास्त जागा जिंकणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
38 mins ago
जिल्हा पंचायत निवडणुकीत जास्तीतजास्त जागा जिंकणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी : गोव्यात (Goa) सध्या जिल्हा पंचायत निवडणुकीचे (Zilla Panchayat Election) मतदान सुरू असून, दुपारी पर्यंत मतदानाला समीश्र प्रतिसाद मिळाला आहे.  राज्यात जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उत्साहात मतदान सुरू असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा पंचायतीच्या ५० जागांपैकी जास्तीतजास्त जागा सत्ताधारी भाजप (BJP), मगो (MG) युतीला मिळणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. 

कोठंबी येथे जिल्हा पंचायतीसाठी सहकुटुंब मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात जिल्हा पंचायतीसाठी उत्साहात मतदान सुरू आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतदान सुरू झाल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजप या निवडणुकीत चांगली कामगिरी करणार आहे.  भाजप ५० पैकी ४० मतदारसंघांत निवडणूक लढवत आहे. काही ठिकाणी युतीतील घटक पक्ष व अपक्षांना पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत जास्तीतजास्त जागा मिळणार असून, भाजप व युतीतील घटक पक्ष या निवडणुकीत चांगली कामगिरी करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. 


हेही वाचा