‘आय वाँट टू टॉक’मध्ये अभिषेक बच्चन नव्या अवतारात!
या शुक्रवारी रोमँटिक क्राईम थ्रिलर ‘ये काली काली आंखे’च्या दुसऱ्या सीझनसोबत ‘व्हेन द फोन रिंग्ज’ नावाचा नवीन कोरियन ओटीटीवर झळकणार आहे. तर चित्रपटगृहात अभिषेक बच्चनचा ‘आय वॉन्ट टू टॉक’ झळकणार आहे.
आय वॉन्ट टू टॉक । थिएटर्स
आय वॉन्ट टू टॉक हा एक हृदयस्पर्शी चित्रपट आहे. जो एका बाप-मुलीच्या जोडीच्या जीवनावर प्रकाश टाकतो. ज्यांचे साधे जीवन एका वैद्यकीय निदानामुळे बदलून जाते. शुजित सरकार दिग्दर्शित या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि बनिता संधू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
ये काली काली आंखे सीझन २ । नेटफ्लिक्स
श्वेता त्रिपाठी, ताहिर राज भसीन आणि आंचल सिंग अभिनीत ये काली काली आंखेच्या आणखी एका आकर्षक हंगामासह परत आले आहेत. नवीन भागांमध्ये विक्रांत, पूर्वा आणि शिखा यांचा समावेश असलेली काही गडद रहस्ये उलगडतील अशी अपेक्षा आहे.
हेलिकॉप्टर हाईस्ट । नेटफ्लिक्स
जोनास बोनियरच्या २०१७ च्या याच नावाच्या कादंबरीवर आधारीत स्वीडिश मिनी-सिरीज दोन बालपणीच्या मित्रांभोवती फिरते. जे त्यांच्या कॅश डेपोमधून लाखो रुपये लुटण्याची योजना आखतात, जी एक भयावह चोरी ठरते.
ग्रीडी पिपल । लायन्सगेट प्ले
हिमेश पटेल, लिली जेम्स आणि जोसेफ गॉर्डन-लेविट यांच्या प्रमुख भूमिका असलेला, हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला विनोदी चित्रपट एका छोट्या बेटावरील शहरातील रहिवाशांवर केंद्रित आहे. जे एका हत्येमुळे संकटात सापडतात. कथानकाला अनपेक्षित वळण येते जेव्हा काही चुकीच्या निर्णयांमुळे परिस्थिती गुंतागुंतीची बनते.
ब्लिट्झ । अॅपल टीव्ही+
ब्लिट्झ ही एक ऐतिहासिक सिरीज आहे. जी एका तरुण मुलाभोवती फिरते. जो दुसऱ्या महायुद्धात लंडनच्या प्रवासाला निघतो आणि अनपेक्षित संकटात सापडतो. दुसरीकडे, त्याची आई त्याचा शोध घेऊ लागते. तिला तिचा तरुण मिळतो का, हे आपल्याला सिरीज पाहिल्यावर लक्षात येईल.
द पियानो लेसन । नेटफ्लिक्स
या शुक्रवारी ओटीटी रिलिजच्या यादीमध्ये द पियानो लेसन नावाच्या चित्रपटाचा समावेश आहे. चित्रपटाचे कथानक चार्ल्स कुटुंबातील सदस्यांवर अवलंबून आहे. ज्यांच्या बंधाची चाचणी, कौटुंबिक वारसा, पियानोद्वारे जपला जातो. माल्कम वॉशिंग्टन दिग्दर्शित हा चित्रपट ऑगस्ट विल्सनच्या पुलित्झर पारितोषिक विजेत्या नाटकावर आधारित आहे.
बिया आणि व्हिक्टर । डिस्ने+ हॉटस्टार
ही एक पोर्तुगीज रोमँटिक मालिका आहे, जी दोन तरुण व्यक्तींना फॉलो करते, जे त्यांच्या योग्य जोडीदाराच्या शोधात लोकांना भेटतात पण त्यांना समजते की त्यांच्यातही काहीतरी असू शकते.
ट्रान्समिट्झवाह । नेटफ्लिक्स
ट्रान्समिट्झवाह हा डॅनियल बर्मन दिग्दर्शित म्युझिकल कॉमेडी चित्रपट आहे. जो एका लोकप्रिय यिद्दिश गायिकेची कथा सांगतो. जी एका शोकांतिकेनंतर तिच्या कुटुंबाचा सामना करण्यासाठी ब्यूनस आयर्समधील तिच्या बालपणीच्या घरी परतते.
ख्रिसमस इव्ह इन मिलर पॉइंट । थिएटर्स
ही कॉमेडी मालिका एका कुटुंबाला फॉलो करते, जे त्यांच्या शेवटच्या सुट्टीसाठी त्यांच्या वडिलोपार्जित घरात एकत्र येतात आणि त्यांच्यात पिढ्यान पिढ्या सुरू असलेले वाद, तणाव बाहेर येतात.
बेस्ड ऑन अ ट्रू स्टोरी सीझन २ । जीओ सिनेमा
ही एक डार्क कॉमेडी मालिका आहे, जी एका रियल्टरवर केंद्रित आहे. जो एका माजी टेनिसपटूसोबत मैत्री करतो. त्यावेळी त्यांना खऱ्या गुन्ह्याचा शोध घेण्याची संधी मिळते.
जॉय । नेटफ्लिक्स
बिल निघी, थॉमसिन मॅकेन्झी आणि जेम्स नॉर्टन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एका तरुण परिचारिका, एक कुशल सर्जन आणि एक हुशार शास्त्रज्ञ यांच्याभोवती फिरतो. जे सर्व अडचणींवर मात करून आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन) स्थापन करण्यासाठी एकत्र येतात.
व्हेन द फोन रिंग्ज । नेटफ्लिक्स
ही कोरियन मालिका एक तरुण जोडपे, एक राजकारणी आणि त्याची मूक पत्नी यांच्यावर केंद्रित आहे, जे वर्षानुवर्षे एकमेकांशी न बोलता जगत आहेत. तथापि, जेव्हा पत्नीचे अपहरण होते आणि पतीला अपहरणकर्त्याकडून धमकीचा फोन येतो तेव्हा त्यांचे आयुष्य उलटे होते. या मालिकेत यू येओन-सीओक, चाए सू-बिन, हीओ नाम-जुन आणि जँग ग्यु-री यांच्या भूमिका आहेत.