आज कोण कोणते चित्रपट, मालिका झळकणार ओटीटी, चित्रपटगृहात...वाचा!

वेट्टयान, द बकिंगहॅम मर्डर आज झळकणार ओटीटीवर

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
07th November, 10:58 pm
आज कोण कोणते चित्रपट, मालिका झळकणार ओटीटी, चित्रपटगृहात...वाचा!


सिंघम अगेन आणि भूल भुलैया ३ चे बॉक्स ऑफिसवर वर्चस्व कायम असल्याने या आठवड्यात चित्रपटगृहात कोणताही चित्रपट झळकणार नाही. त्यामुळे ओटीटीवर आपल्याला आज नवनवीन चित्रपट व मालिका पाहता येणार आहेत. या यादीमध्ये द बकिंगहॅम मर्डर्स, एला, ख्वाबों का झमेला, वेट्टाय्यान, मिस्टर प्लँक्टन, इन्व्हेस्टिगेशन एलियन आदींचा समावेश आहे.


वेट्टयान । अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
रजनीकांत, अमिताभ बच्चन, राणा दग्गुबती, मंजू वॉरियर आणि फहद फासिल यांच्या प्रमुख भूमिका असलेला, हा तमिळ ॲक्शन-पॅक्ड चित्रपट एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरतो, जो शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतो.


द बकिंगहॅम मर्डर । नेटफ्लिक्स
करीना कपूर खान अभिनीत हा थ्रिलर चित्रपट एका ब्रिटिश-भारतीय गुप्तहेराची कथा सांगतो, जी वैयक्तिक शोकांतिकेनंतर नवीन गावात स्थलांतरित होते. नंतर तिला हरवलेल्या मुलाचा समावेश असलेले एक गुंतागुंतीचे प्रकरण सोडविण्यासाठी नियुक्त केले जाते. जसजसा तपास पुढे सरकतो, तसतशी ती समाजातील गुपिते उलगडत जातात, जी तिला स्वतःच्या भीतीचा धीराने सामना करण्यास भाग पाडतात.


ख्वाबों का झमेला । जिओसिनेमा
ख्वाबों का झमेला हा चित्रपट जुबिन नावाच्या तरुणाभोवती फिरतो. त्याचे जीवन उलथापालथ होते, जेव्हा एक प्रशिक्षक, रुबी त्याच्या आयुष्यात येते आणि त्याला त्याच्या पूर्वीच्या प्रेयसीशी पुन्हा संपर्क साधण्यास मदत करते. या चित्रपटात कुब्बरा सैत, प्रतीक बब्बर आणि सयानी गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
मि. प्लँक्टन । नेटफ्लिक्स
नेटफ्लिक्सवर मिस्टर प्लँक्टन नावाचा एक नवीन कोरियन ड्रामा आज झळकणार आहे. वू डो-ह्वान, ली यू-मी, ओह जंग-से आणि किम हे-सूक अभिनीत, ही सिरीज चुकीच्या जगात जन्मलेल्या माणसाच्या कथेवर आधारीत आहे.
एला । थिएटर्स
एला हा एक एज-ऑफ-द-सीट थ्रिलर चित्रपट आहे, जो एका ९ वर्षांच्या तरुण मुलीच्या भोवती फिरतो. जी एका प्राण्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस, धोकादायक गुन्हेगार आणि गूढवाद्यांच्या तावडीत सापडते. या चित्रपटात ईशा तलवार, मकरंद देशपांडे आणि सरन्या शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
द केज । नेटफ्लिक्स
हा एक रोमांचक ॲक्शन-पॅक चित्रपट आहे. ॲक्शन मूव्हीच्या शौकीनांसाठी एक ट्रीट ठरणार आहे. याचे कथानक व्यावसायिक बॉक्सर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाभोवती फिरते. एके दिवशी त्याला त्याचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळते, जेव्हा एक अनपेक्षित सामना त्याला व्यावसायिक बॉक्सर्सच्या लीगमध्ये उतरवतो.


विजय ६९ । नेटफ्लिक्स
विजय ६९ नावाच्या स्लाईस ऑफ लाइफ चित्रपट एका माजी जलतरण प्रशिक्षकाभोवती केंद्रित आहे, जो वयाच्या ६९ व्या वर्षी ट्रायथलॉन स्पर्धेत भाग घेतो. या चित्रपटात अनुपम खेर मुख्य भूमिकेत आहेत.


एआरएम - डिस्ने + हॉटस्टार
बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केल्यानंतर, टोविनो थॉमसचा ॲक्शन-पॅक ॲडव्हेंचर फ्लिक चित्रपट आज ओटीटीवर झळकणार आहे. चित्रपटाचे कथानक वेगवेगळ्या पिढ्यांमधील तीन नायकांभोवती फिरते, मनियान, कुंजीकेलू आणि अजयन, जे बाहेरील लोकांपासून आपल्या भूमीचे आणि त्याच्या खजिन्याचे रक्षण करतात.


इन्व्हेस्टिगेशन एलियन । नेटफ्लिक्स
इन्व्हेस्टिगेशन एलियन हा एक माहितीपट आहे, जो आपल्या ग्रहावर युएफओचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पुराव्याच्या शोधात जगाच्या विविध भागांमध्ये प्रवास करणाऱ्या पत्रकार जॉर्ज नॅपवर केंद्रीत आहे.


बँक अंडर सीज । नेटफ्लिक्स
१९८१ मध्ये सेट केलेली, ही आकर्षक मालिका बार्सिलोनाच्या सेंट्रल बँकेच्या मुख्यालयात घुसलेल्या अकरा हूड पुरुषांच्या गटावर केंद्रित आहे. ज्यांनी अनेक लोकांना ओलीस ठेवले आहे. दरम्यान, एक रिपोर्टर चोरीमागील खरा हेतू उलगडण्याचा प्रयत्न करतो.


जनक आयते गणक । अहा

जनक आयते गणका हा संदीप रेड्डी बंदला यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला तेलुगू कॉमेडी चित्रपट आहे. जो एका विवाहित मध्यमवर्गीय पुरुषाची कथा सांगतो. जो कमी उत्पन्नामुळे पितृत्व टाळत आहे, ज्याचे आयुष्य त्याच्या पत्नीने गर्भधारणेची घोषणा केल्यावर उद्ध्वस्त होते. पुढे काय होते ते आपल्याला चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल.      

हेही वाचा