फोंडा: शिगाव - कुळे येथे चालत्या दुचाकीवर झाड कोसळले. केवळ दैव बलवत्तर म्हणून दुचाकी चालक यातून सुखरूप बचावला. मात्र या घटनेमुळे सावर्डे- शिगाव मार्गांवरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली.
मिळालेल्या माहितीनुसार जीए -१२- बी - ६१५३ क्रमांकाची दुचाकी घेऊन सदर युवक कुळे येथून सावर्डे येथे जात होता. शिगाव येथे पोहचताच रस्त्याच्या बाजूला असलेले मोठे झाड रस्त्यावर कोसळले. सुदैवाने दुचाकीचालकास गंभीर दुखापत झाली नाही.
कुडचडे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील झाड बाजूला करत वाहतूक कोंडी सोडवली. .