मध्यपूर्व आशिया : चवताळलेल्या हिजबुल्लाहने इस्रायलला डिवचले; नेतन्याहूंच्या घरावर ड्रोन अटॅक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
19th October, 03:05 pm
मध्यपूर्व आशिया : चवताळलेल्या हिजबुल्लाहने इस्रायलला डिवचले; नेतन्याहूंच्या घरावर ड्रोन अटॅक

बेरूत / तेल अविव : इस्रायल विरुद्ध हमास आणि इराणप्रणीत हिजबुल्लाहने पुन्हा मोर्चा उघडला आहे. नुकतेच इस्रायलने हवाई हल्ला करत हमासचा म्होरक्या सिनवार याचा खात्मा केला होता. हिजबुल्लाहने आता पुन्हा एकदा लेबनानमधून इस्रायली इमारतीवर ड्रोन हल्ला केला आहे. ड्रोनच्या माध्यमातून इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu's Recidence Attacked) यांच्या घराला टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इस्रायलमधील ‘हैफा सीझेरिया’ भागात हा हल्ला करण्यात आला.  


Netanyahu home drone attack - Benjamin Netanyahu home in Caesarea drone  attack - India Today

समोर आलेल्या माहितीनुसार, दक्षिण हैफा येथील सीझेरिया परिसरात असलेल्या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थाजवळच एका ड्रोनचा स्फोट झाला. इस्रायली सुरक्षा दलांनी या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे ड्रोन मोकळ्या जागेत पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी हैफा परिसरात लेबनानमधून डागलेल्या रॉकेटमुळे वॉर्निंग सायरन वाजले होते. यामुळे येथून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. 

Hezbollah UAV that killed 4 dropped off radar, then briefly reappeared -  probe | The Times of Israel

समोर आलेल्या माहितीनुसार, थेट लक्ष्यावर मारा करण्याची क्षमता या ड्रोनमध्ये होती. हा हल्ला रोखण्यात अपयश आल्याचे आयडीएफच्या जवानांनी मान्य केले आहे. इस्रायली लष्करानुसार, लेबनानहून तीन ड्रोन हैफाच्या दिशेने आले होते. त्यापैकी रडारवर फक्त दोन ड्रोन टिपण्यात आले. तिसऱ्या ड्रोनने सीझेरियातील एका इमारतीवर अचूक हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींनुसार, त्यामुळे मोठा स्फोट झाला.


Israel shoots down missiles and drones after Iran launches unprecedented  attack : NPR

हे ड्रोन लेबनानमधून सुमारे ७० किलोमीटर अंतरावरून आले आणि थेट सीझेरियामधील एका इमारतीला धडकले. ड्रोन इस्रायली हवाईहद्दीत घुसल्यानंतर उत्तर तेल अवीवमधील ग्लिलॉट वस्तीमधील लष्करी तळांचे सायरन वाजू लागले. प्रत्यक्ष हल्ला करण्यापूर्वी हे ड्रोन एक तास इमारतीभोवती घिरट्या घालत होते, इस्रायली सैन्याने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्रायल सातत्याने हिजबुल्लाहचे तळ आणि प्रमुख नेत्यांना टार्गेट करत आहे. इस्रायलने या संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाहचा देखील खात्मा केला आहे.

Is Hezbollah behind drone attack targeting Benjamin Netanyahu? Strike  launched towards Israel PM's house- The Week





हेही वाचा