देश : 'आखाती देशांत शिजला भारतात गृहयुद्ध भडकवण्याचा कट',ईडीचा 'पीएफआय'संदर्भात खुलासा

प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) भारतात गृहयुद्ध सुरू करू इच्छित असल्याचे तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने उघड केले. यासाठी त्यांनी सिंगापूरसह परदेशात १३ हजारांहून अधिक सक्रिय सदस्य तयार केले आहेत.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
19th October, 11:44 am
देश : 'आखाती देशांत शिजला भारतात गृहयुद्ध भडकवण्याचा कट',ईडीचा 'पीएफआय'संदर्भात खुलासा

नवी दिल्ली : प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) बाबत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठा खुलासा केला आहे. ईडीच्या तपासात पीएफआयचे परदेशात मोठे नेटवर्क असल्याचे समोर आले आहे. सिंगापूर आणि आखाती देशांमध्ये PFI चे १३ हजारांहून अधिक सक्रिय सदस्य आहेत. या देशांमध्ये पैसे गोळा करण्यासाठी पीएफआयने एक समिती स्थापन केली आहे, जी पैसे गोळा करून हवालाच्या माध्यमाने भारतात पाठवते, असेही समोर आले आहे. येथे हा पैसा दहशतवादी आणि इतर बेकायदेशीर कामांमध्ये वापरला जातो. जिहादच्या माध्यमातून भारतात इस्लामिक राज्य स्थापन करणे हे पीएफआयचे खरे उद्दिष्ट आहे.

ED attaches PFI assets worth ₹56 cr, says outfit has 13,000 members abroad  | Latest News India - Hindustan Times

मनी लाँड्रिंग प्रकरणात सुरू असलेल्या तपासात ईडीने आतापर्यंत ९४ कोटी रुपयांच्या गुन्ह्याशी संबंधित मालमत्ता शोधून काढल्या आहेत. तीन वर्षांत अंमलबजावणी संचालनालयाने पीएफआयशी संबंधित २६ जणांना अटक केली आहे. दरम्यान, पीएफआय या प्रतिबंधित संघटनेबाबत आता ईडीने मोठा खुलासा केला आहे. ईडीच्या तपासात असे समोर आले आहे की, पीएफआयचे तब्बल १३ हजार सक्रिय सदस्य अजूनही परदेशात आहेत. 


PFI पर ED का बड़ा ऐक्शन : 56 करोड़ की 35 संपत्तियों को जब्त कर तोड़ी आर्थिक  कमर

गेल्या तीन दिवसांत केलेल्या धडक कारवाईत अंमलबजावणी संचालनालयाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या ३५ जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्तांची किंमत सुमारे ५७ कोटी रुपये आहे. या मालमत्तांमध्ये अनेक ट्रस्ट, कंपन्या आणि खाजगी मालमत्तांचाही समावेश आहे. दिल्ली पोलिस आणि एनआयएने नोंदवलेल्या प्रकरणांच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. देशात आणि परदेशातून पीएफआयच्या २९ खात्यांमध्ये निधी आल्याचे तपासात उघड झाले आहे. डमी शेल कंपन्यांकडून हवाला व अन्य माध्यमातून निधी पाठविला जात होता. 

What is the Popular Front of India?

या देशांमध्ये राहणाऱ्या अनिवासी मुस्लिमांकडून पैसे गोळा करण्यासाठी PFI ने जिल्हा कार्यकारी समिती (DEC) स्थापन केली. ज्यांना कोट्यवधी रुपयांच्या निधीचे संकलन करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. हा पैसा भारतातील PFI च्या दहशतवादी आणि बेकायदेशीर कारवायांसाठी वापरला जातो.


ED finds 'financial link' between PFI and anti-CAA protests; organisation  denies - CNBC TV18


हवाई हल्ले आणि गनिमी युद्धाचे नियोजन

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या तपासणीत आढळले की पीएफआय भारतात गृहयुद्ध छेडण्यासाठी हवाई हल्ले आणि गनिमी युद्ध करण्यासाठी स्वतंत्र दूरसंचार यंत्रणा तयार करण्याचा विचार करत आहे. 


PFI received cash worth crores of rupees from Gulf countries through  Hawala: ED | DETAILS – India TV

यासोबतच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI)वर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

१) फेब्रुवारी २०२०  मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीत हिंसाचार भडकवण्याचा आणि त्रास निर्माण करण्याचा कट.

२) हातरसमध्ये जातीय वातावरण बिघडवण्यासाठी आणि दहशत पसरवण्यासाठी PFI आणि CFI सदस्यांची भेट.

३) दहशतवादी गट तयार करणे, प्राणघातक शस्त्रे आणि स्फोटक साहित्याचा साठा करणे आणि प्रमुख व्यक्तींसह महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर हल्ले करणे.

४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा दौऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी प्रशिक्षण शिबिर तयार करणे.

५) देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणारे साहित्य तयार करणे, छापणे आणि ताब्यात ठेवणे.

तपासानंतर, पीएफआयच्या ५६.५६ कोटी रुपयांच्या ३५  स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्ता पीएफआयशी संबंधित विविध ट्रस्ट, व्यक्ती आणि कंपन्यांच्या नावावर होत्या.

६) या आरोपांसंदर्भात NIA ने PFI नेते आणि कार्यकर्त्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे आणि 'दहशतवादासाठी वापरल्या जाणाऱ्या' १७ मालमत्ता जप्त केल्या आहेत.


हेही वाचा