मेरशी जंक्शनजवळ ट्रक-स्कुटर अपघातात युवतीचा मृत्यू

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
10 hours ago
मेरशी जंक्शनजवळ ट्रक-स्कुटर अपघातात युवतीचा मृत्यू

पणजी : मेरशी जंक्शनजवळ लष्कराचा ट्रक आणि दुचाकीमध्ये गुरुवार, दि. १७ रोजी सकाळी अपघात झाला. या अपघातात जखमी झालेली अंकिता वळवईकर (२६, चोडण) या युवतीचा बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी लष्कराचा ट्रक चालक शुभम कुमार (२९) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, १७ रोजी सकाळी १०.५० वाजता दुचाकी चालक अंकिता वळवईकर बांबोळीहून मेरशीच्या बाजूने येत होती. त्याच वेळी तिच्या मागे लष्कराचा ट्रक येत होता. याच दरम्यान ट्रक चालकाने तिच्या दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकी चालक अंकिता गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला नोटीस बजावून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. 

हेही वाचा