‘किंग ऑफ डान्स’ प्रभू देवा कमाईतही सम्राट!

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
17th October 2024, 09:22 pm
‘किंग ऑफ डान्स’ प्रभू देवा कमाईतही सम्राट!

भारतीय कोरिओग्राफर, अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक प्रभू देवा यांना कोण ओळखत नाही? तो इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारा कोरिओग्राफर आहे. चला तर आज जाणून घेऊया प्रभू देवाची संपत्ती.

प्रभू देवा शास्त्रीय आणि पाश्चात्य शैलीतील नृत्य प्रकारात निपुण आहे. तो देशाचा आवडता कोरिओग्राफर असून त्याच्या डान्सचे सर्वांनाच वेड लागले आहे. केवळ बॉलिवूडच नाही तर तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही त्याने काम केले आहे. सुरुवातीला प्रभू देवा बॅकग्राउंड डान्सर होते आणि त्यानंतर त्याने चित्रपटांमध्ये कोरिओग्राफी करण्यास सुरुवात केली.


कोरिओग्राफर झाल्यानंतर प्रभू देवाने अभिनयाला सुरुवात केली. मुकाबला आणि उर्वशी या गाण्यांनी प्रभू देवा खूप लोकप्रिय झाला. यानंतर प्रभू देवाच्या करिअरचा आलेख वाढतच गेला आणि त्याची कमाईही वाढू लागली. एका अहवालानुसार प्रभू देवाची एकूण संपत्ती १३७ कोटी आहे. म्हैसूरपासून १७ किलोमीटर पुढे दूरा येथे प्रभुदेवाची मालमत्ता आहे. त्या जागेवर तो शेतीही करतो. सध्या प्रभू मुंबईत राहतो. प्रभू देवाकडे बेंझ जीएलई क्लास बीएमड्ब्ल्यू एम४, आउडी क्यू७, बेंटली कॉन्टीनंटल यांसारख्या महागड्या गाड्या आहेत.

प्रभूने केले या चित्रपटांचे दिग्दर्शन

प्रभू देवाने तेलुगू चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. प्रभू देवाने दिग्दर्शित केलेला पहिला हिंदी चित्रपट सलमान खानचा वॉन्टेड हा सुपरहिट ठरला होता. यानंतर त्याने राउडी राठोड, रमैया वस्तावैय्या, आर राजकुमार, अॅक्शन जॅक्सन, सिंग इज ब्लिंग, दबंग ३ आणि राधे दिग्दर्शित केले.

घटस्फोटामुळे आर्थिक परिस्थिती बिकट

प्रभू देवाने १९९५ मध्ये रामलतासोबत लग्न केले, मात्र नंतर दोघांचा घटस्फोट झाला. २०११ मध्ये प्रभू देवाने रामलताला घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर त्याची आर्थिक स्थिती ढासळल्याची बातमी आली होती. घटस्फोटानंतर प्रभू देवाने रामलताला १० लाख रुपये दिले.

हेही वाचा