लेबनान : इस्रायली सैन्य लेबनॉनमध्ये घुसले; सीमेवरील गावांमध्ये मर्यादित ग्राउंड ऑपरेशन

आयडीएफने दिली माहिती : हिजबुल्लाहची स्थाने, पायाभूत सुविधा नष्ट करण्यास सुरुवात

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
01st October, 12:05 pm
लेबनान : इस्रायली सैन्य लेबनॉनमध्ये घुसले; सीमेवरील गावांमध्ये मर्यादित ग्राउंड ऑपरेशन

बेरूत : इस्रायली सैन्य लेबनॉनमध्ये घुसले आहे. इस्रायल संरक्षण दलाने (आयडीएफ) मंगळवारी सकाळी ही माहिती दिली. आयडीएफने सोमवारी रात्री दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहची स्थाने आणि पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी सीमेवरील गावांमध्ये मर्यादित ग्राउंड ऑपरेशन सुरू केले.

सीमेजवळील गावांना लक्ष्य करत असल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. येथून हिजबुल्लाह इस्रायलवर हल्ला करतो. आयडीएफने सांगितले की, त्यांच्या सैनिकांनी अलीकडेच या हल्ल्यासाठी प्रशिक्षण घेतले होते. गुप्तचर माहितीच्या आधारे हे हल्ले केले जात आहेत. यामध्ये इस्त्रायली हवाई दल त्यांना मदत करत आहे.

इस्रायलला लेबनॉनमधील जमिनीवरील कारवाईसाठी अमेरिकेचा पाठिंबा मिळाला आहे. इराणने इस्रायलवर हल्ला केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी सांगितले.

माहितीनुसार, २००६ नंतर इस्त्रायली सैन्य लेबनॉनमध्ये घुसण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यानंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात ३३ दिवस युद्ध झाले. यामध्ये ११०० हून अधिक लेबनीज मारले गेले. त्याच वेळी, इस्रायलमधील १६५ लोकांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा