मल्याळम चित्रपट अट्टमला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला
मुंबई : शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. भारतीय चित्रपट सृष्टीत दिल्या जाणाऱ्या सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी असा हा एक पुरस्कार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पत्रकार परिषदेत भारतीय चित्रपट क्षेत्रातील विजेत्यांची नावे जाहीर केली.
दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांसह राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना ऑक्टोबर २०२४ रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात येईल.
विजेत्यांची संपूर्ण यादी येथे पहा:
सर्वोत्कृष्ट अभिनेता - कांतारा साठी ऋषभ शेट्टी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - तिरुचित्रंबलम (तमिळ) साठी नित्या मेनन आणि कच्छ एक्सप्रेस (गुजराती) साठी मानसी पारेख
सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपट - कांतारा
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म - अट्टम
ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपट- ब्रह्मास्त्र
सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट - कार्तिकेय २
सर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपट - दमण
सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट - बागी दी धी
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - वाळवी
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट - KGF: चॅप्टर २
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - गुलमोहर
सर्वोत्कृष्ट कृती दिग्दर्शन पुरस्कार - KGF: चॅप्टर २
सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट - इमुथी पुथी
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट - सौदी वेल्लाक्का
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - जानी आणि सतीश कृष्णन
सर्वोत्कृष्ट गीत - फौजा
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट - पोन्नीईन सेल्वन : भाग १
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - ब्रह्मास्त्रसाठी प्रीतम आणि पोन्नीईन सेल्वन : भाग १ साठी एआर रहमान
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर - कच्छ एक्सप्रेस, निक्की जोशी
सर्वोत्कृष्ट संपादन - अट्टम
सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना - पोन्नीईन सेल्वन : भाग १
सर्वोत्कृष्ट संवाद लेखक - गुलमोहर
सर्वोत्कृष्ट छायांकन - पोन्नीईन सेल्वन : भाग १
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - अरिजित सिंग (केसरिया -ब्रह्मास्त्र )
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका - बॉम्बे जयश्री ( छायाम वेइल- सौदी वेल्लाक्का )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - उंचाई - नीना गुप्ता
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - फौजा - पवनराज मल्होत्रा
स्पेशल मेन्शन अभिनेता - मनोज बाजपेयी (गुलमोहर)