वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी ३ संघांचे आव्हान
मुंबई : टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावरून आल्यानंतर सध्या रिलॅक्स मोडमध्ये आहे. टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यात टी २० आणि वनडे सीरिज खेळली. टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात श्रीलंकेला ३-० अशा फरकाने क्लिन स्वीप दिला. त्यानंतर रोहित शर्मा याच्या कॅप्टन्सीत भारताला एकदिवसीय मालिका गमवावी लागली. मालिकेतील पहिला सामना बरोबरीत राहिल्यांतर श्रीलंकेने उर्वरित दोन्ही सामने जिंकले. श्रीलंकेने अशाप्रकारे ३ सामन्यांची मालिका २-० अशा फरकाने जिंकली. त्यानंतर श्रीलंका आता इंग्लंड दौऱ्याला रवाना झाली आहे. तर टीम इंडिया पुढील महिनाभार विश्रांतीवर असणार आहे. मात्र त्यानंतर टीम इंडियाचा भरगच्च कार्यक्रम आहे.
टीम इंडिया पुढील ५ महिन्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ११ दिवसांमध्ये एकूण १० कसोटी सामने खेळणार आहे. भारतासमोर बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गदेने २ वेळा हुलकावणी दिली आहे. टीम इंडियाचा २०२१ साली न्यूझीलंड तर २०२३ मध्ये अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने पराभव केला. त्यामुळे यंदा तिसऱ्या प्रयत्नात टीम इंडियाचा अंतिम फेरीत पोहचून विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र टीम इंडियाचा यात चांगलाच कस लागणार आहे. टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध २, न्यूझीलंड विरुद्ध ३ तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध ५ कसोटी सामने खेळणार आहे.
टीम इंडिया बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. तर नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. उभयसंघात प्रतिष्ठेची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धा होणार आहे.
इंडिया-बांगलादेश कसोटी मालिका
पहिला सामना, १९-२३ सप्टेंबर, चेन्नई
दुसरा सामना, २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर, कानपूर
इंडिया न्यूझीलंड टेस्ट सीरिज
पहिला सामना, १६-२० ऑक्टोबर, बंगळुरु
दुसरा सामना, २४- २८ ऑक्टोबर, पुणे
तिसरा सामना, १-५ नोव्हेंबर, मुंबई
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (वि. ऑस्ट्रेलिया)
पहिला सामना, २२-२६ नोव्हेंबर, पर्थ
दुसरा सामना, ६-१० डिसेंबर, एडलेड
तिसरा सामना, १४-१८ डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथा सामना, २६-३० डिसेंबर, मेलबर्न
पाचवा सामना, ३-७ जानेवारी २०२५, सिडनी