भारतीय तरुणाची AI विश्वात दिमाखदार झेप, मेटामध्ये मिळालं ८५४ कोटी रुपयांचे पॅकेज!,

फेसबुक, गुगल, ओपनएआयमधून अनुभव घेत मेटाच्या महत्त्वाकांक्षी AGI प्रकल्पात मोठी जबाबदारी.

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
भारतीय तरुणाची AI विश्वात दिमाखदार झेप, मेटामध्ये मिळालं ८५४ कोटी रुपयांचे पॅकेज!,

पणजीः चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी शोधणारी युवा मंडळी आज मेट्रो शहरांकडे धाव घेत असलेली आपल्याला पहायला मिळत आहेत. या स्वप्नांचा पाठलाग करताना प्रचंड मेहनत करावी, आव्हान स्वीकारावी लागतात. त्यावर मात करून जे पुढे जातात त्यांच्या यशोगाथा चर्चेत येतात. 

उत्तर प्रदेशच्या त्रापित बंसल (Trapit Bansal) नावाच्या एका तरुणाची यशोगाथा सोशल मीडियापासून माध्यमांपर्यंत चर्चेत आहे. हा तोच तरुण आहे ज्याला मेटा (Facebook ची मूळ कंपनी) कडून 'सुपर इंटेलिजेंस टीम'साठी कोट्यवधींच्या पगाराची नोकरी मिळाली आहे. आयआयटी पदवीधर त्रपित बंसलने त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत अनेक ठिकाणी काम केले, त्यानंतर आता त्रापित बंसलला आता मेटाकडून तब्बल ८५४ कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.

मेटाच्या 'या' प्रोजेक्टमध्ये त्रपित झाला आहे सामील
Meta ही कंपनी सध्या आपल्या Superintelligence Labs च्या माध्यमातून Artificial General Intelligence (AGI) तयार करण्याचे काम करत आहे. AGI म्हणजे अशी कृत्रिम बुद्धिमत्ता जी माणसासारखी विचार करू शकते, शिकू शकते आणि नवी कामे समजून घेऊन करू शकते. या महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये त्रापित बंसल आता थेट सामील झाला आहे.


'त्रापित'चे शिक्षण किती?
त्रापित बन्सल हा आयआयटी पदवीधर आहेत. त्याने आयआयटी कानपूरमधून गणित आणि सांख्यिकी या विषयात विज्ञान शाखेची पदवी घेतली आहे. पदवीधर झाल्यानंतर, त्रापितने मॅसॅच्युसेट्स अमहर्स्ट विद्यापीठातून संगणक शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आणि पीएचडी देखील पूर्ण केली.

आत्तापर्यंत 'या' ठिकाणी केले काम
२०१२ मध्ये कारकिर्दीला सुरुवात केली. प्रथम त्यांनी गुरुग्राममधील एक्सेंचर येथे विश्लेषक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी २ वर्षे आयआयएससीमध्ये संशोधन सहाय्यक म्हणून काम केले. नंतर त्रापितने फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआय सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप केले. तसेच २०१७ मध्ये ओपनएआय येथे इंटर्नशिप केली. तेथे त्यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सदस्य म्हणून काम केले. त्रापितने सह-संस्थापक इल्या सुत्स्केव्हर यांच्यासोबत रीइन्फोर्समेंट लर्निंगवर संशोधन केले आणि येथे एआयच्या क्षेत्रातही काम केले आहे. २०२२ मध्ये तो OpenAI मध्ये फुलटाइम टेक्निकल स्टाफ म्हणून नियुक्त झाला. आणि आता Meta च्या AGI प्रकल्पासाठी त्याची निवड झाली आहे. एका रिपोर्ट्सनुसार, त्रापितला मेटामध्ये सुमारे ८५४ कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.


हेही वाचा