आयसिसचा कुख्यात दहशतवादी रिझवान अलीला अटक,दिल्ली स्पेशल सेलची कारवाई

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th August 2024, 02:29 pm
आयसिसचा कुख्यात दहशतवादी रिझवान अलीला अटक,दिल्ली स्पेशल सेलची कारवाई

नवी दिल्ली :  दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शुक्रवारी पहाटे पुणे आयसिस मॉड्यूलचा प्रमुख सदस्य रिझवान अब्दुल हाजी अली याला अटक केली आहे. तब्बल ३ लाखांचे बक्षीस असलेल्या अलीला या गटातील सर्वात कुख्यात दहशतवादी मानले जात होते. एनआयएने अलीच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले होते. पुणे पोलिसांच्या तावडीतून तो पळून गेल्यापासून विविध तपास यंत्रणा त्याच्या शोधात होत्या. 

दिल्ली में गिरफ्तार मोस्ट वांटेड आतंकवादी, ISIS से लिंक; स्वतंत्रता दिवस से  पहले बड़ी कामयाबी | Republic Bharat


जुलै २०२३ मध्ये एनआयएने पुण्यातील आयसिस मॉड्यूलचा पर्दाफाश करत दहशतवादी कारवायांसाठी वापरली जाणारी शस्त्रे, स्फोटके, रसायने तसेच आयसिसशी निगडीत प्रतिबंधित साहित्य देखील जप्त केले होते. दरम्यान याप्रकरणी एकूण ११ जणांवर आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. यावर्षी मार्चमध्ये एनआयएने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात अन्य तीन मुख्य आरोपींसह  रिझवान अलीचे नावदेखील होते. 

ISIS terrorist Rizwan Ali arrested in Delhi ahead of Independence Day

एनआयएनुसार हे सर्वजण आयसिस या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत आणि संघटनेच्या दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याच्या मोठ्या कटाचा एक भाग म्हणून पुण्यात आणि आसपास दहशत पसरवण्याच्या योजनेत त्यांचा सक्रिय सहभाग होता . दिल्लीच्या दर्यागंजचा रहिवासी असलेल्या अलीने पुणे आयसिस मॉड्यूलच्या इतर सदस्यांसह दिल्ली आणि मुंबईतील अनेक हाय-प्रोफाइल ठिकाणांची रेकी केली होती. पोलिसांनी अलीच्या ताब्यातून अनेक शस्त्रेही जप्त केली आहेत. पुणे आयसिस मॉड्यूलच्या अनेक सदस्यांना पुणे पोलीस आणि एनआयएने यापूर्वी अटक केली आहे.

दिल्ली-फरिदाबाद सीमेवरून शुक्रवारी पहाटे रिझवानला शस्त्रास्त्रांसह पकडण्यात आल्याची माहिती आहे. त्‍याच्‍यावर यूएपीएअंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला असून रिझवानचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. रिझवान आणि अन्य दोन दहशतवादी मोस्ट वॉन्टेड यादीत होते. त्यापैकी एक शाहनवाजला गतवर्षी सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती, तर अब्दुल्ला उर्फ ​​डायपरवाला अद्याप फरार आहे.

हेही वाचा