गोवन वार्ता : लाईव्ह अपडेट्स : गोव्यात मुसळधार पावसाचा कहर; जाणून घ्या कुठे काय घडले

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
01st August 2024, 11:21 am
गोवन वार्ता : लाईव्ह अपडेट्स : गोव्यात मुसळधार पावसाचा कहर; जाणून घ्या कुठे काय घडले

LIVE UPDATES : (ASCENDING ORDER) 



*राज्यातील पावसाचा जोर अोसरण्याची शक्यता. हवामान विभागाने 'रेड अलर्ट' हटवला. 'ऑरेंज अलर्ट' जारी.

*काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पेडणे तालुक्यातील हळर्ण किल्ल्याची भिंत कोसळली.

*मुरमूणे- सत्तरी येथील साकव वाहून गेला.

*तिराळ-उसगाव रस्त्यावर पाणी भरल्याने विद्यार्थ्यांना घरी पोहोचविण्यासाठी फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांकडून बोटचा वापर. स्थानिकांकडून जवानांचे कौतुक.

*डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी डिचोलीत दाखल. उपजिल्हाधिकारी, मामलेदारांसह वेगवेगळ्या भागांची केली पाहणी.

*पणजी महापालिका इमारतीच्या बाजूला झाड कोसळून दोन कारचे नुकसान.

*मयते-अस्नोडा येथे भेट देऊन  जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी उपजिल्हाधिकारी कबीर शिरगावकर यांच्या समवेत घेतला पुराचा आढावा. आतापर्यंत १२ घरांमध्ये शिरले पाणी.

*साखळी येथे वाळवंटीचे पाणी जवळच्या दत्त मंदीरात पोहोचले

*शापोरा नदीला पूर आल्याने राण्याचे जुवे-नादोडा, कामुर्ली, कोलवाळ भागात शिरले पाणी.

*उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी केली डिचोलीतील पुराची पाहणी

*पार नदीची पातळी वाढल्याने मयते-अस्नोडा मध्ये पुरसदृश्य स्थिती. काही घरांत शिरले पाणी.

*पावसामुळे पूर आलेल्या ज्या ज्या भागांतील विद्यार्थी आज सकाळी शाळेत गेलेली आहेत, त्य‍ांच्या पालकांना तत्काळ बोलवून त्यांना  घरी पाठवण्याचे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांचे शाळा व्यवस्थापनांना निर्देश.

*वाडी-तळावली येथील दत्ताराम च्यारी यांच्या गॅरेज जवळील नाल्याची संरक्षक भिंत कोसळली. गॅरेजचे नुकसान.

*मोपातील कडशी नदीला पूर आल्यामुळे दोन्ही पूल पाण्याखाली गेलेत, वाहतूक ठप्प. गावांचा संपर्क तुटला.

* १ जून ते १ ऑगस्ट दरम्यान वाळपईत १५१.५१ इंच पावसाची नोंद झाली असून. गेल्या चोवीस तासात राज्यात सरासरी ५.३३ इंच पाऊस पडल्याची नोंद झाली आहे तर, केपेमध्ये तब्बल ७.८७ इंच पावसाची नोंद. 

*कांदोळी येथे दुकळे हॉस्पिटल जवळील एका घराच्या कार पार्किंग शेडवर झाड कोसळून नुकसान.

*बाराजण -खोतोडा येथील रस्ता पाण्याखाली. अनेक वाहने पडली अडकून. जनजीवन विस्कळीत.

*दरम्यान, हवामान खात्याने येत्या ३ तासात ताशी १५  मीमी पेक्षा अधिक प्रमाणात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा इशारा जारी केला आहे. 

*गरज नसल्यास घरातून बाहेर पडू नये असे आवाहन तिलारीचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी केले आहे. याच बरोबर तिलारीतुन सुरु असलेल्या विसर्गात सुद्धा झपाट्याने वाढ होत आहे. एकंदरीत पावसाची स्थिती पाहता तिलारी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन प्रकल्पाकडून करण्यात आले आहे.

Herald: GOA REELS UNDER RAIN RAMPAGE

*भेडशी दोडामार्ग येथे मुसळधार पावसामुळे पाणी रस्त्यांवर आले असून यात अनेक वाहने पाण्याखाली गेली आहेत. नुकतेच तिलारी धरणाच्या व्यवस्थापनाकडून आलेल्या माहितीनुसार,  गेल्या २४ तासात तिलारीत तब्बल २२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या पावसाची तीव्रता जास्त असल्याने, नदी, नाले, ओढ्याच्या ठिकाणी अचानक प्रवाह संचलित होऊ शकतो


*कोकणातही पावसाचे थैमान सुरूच असून, आज गुरुवारी सकाळी भेडशी पुलाच्या जोड रस्त्यावर पुराच्या पाण्यात फसलेल्या चोघांना दोडामार्ग पोलिसांनी  जीवदान दिले. समोर आलेल्या माहितीनुसार,भेडशी जोड रस्त्यावर पाणी आल्याने नव्याने बांधण्यात आलेल्या मोरी नजदीक दोन चार चाकी गाडी पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचत बचावकार्य सुरू केले

*मुसळधार पावसामुळे कासारवर्णेतही पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिणेतही पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून, शिरवई-जांबावलीतील (कुडचडे) रस्ता पाण्याखाली.परिसरात पुराची स्थिती निर्माण झाली आहे. 

* सावर्शे येथे नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने वाळप‌ई - फोंडा रस्तादेखील वाहतुकीसाठी तूर्त बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान कळणे नदीला पूर आल्याने चांदेलमधील रस्ता पाण्याखाली गेला आहे. याचा वाहतूकीवर देखील परिणाम झाला असून चांदेलचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे.

*नानोडा-डिचोली येथे  विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जाणारी कदंब बस पुराच्या पाण्यात अडकून बंद पडल्याची देखील माहिती समोर येत आहे. पावसामुळे साळमधील भूमिका मंदिर परिसर पाण्याने व्यापला गेला असून पुरसदृश्य स्थितीमुळे येथील रस्ते पूर्णतः पाण्याखाली गेलेत. 

*आज सकाळी मुसळधार पावसामुळे वाळवंटी नदीला पूर आला असून, केरी-घोटेली पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच  दूधसागर नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने निरंकालमधील, तर म्हादईची पातळी वाढल्याने गांजे-उसगाव रस्ता पुरताच पाण्यात गेल्याने याचा वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. 

पणजी : गेल्या महिनाभरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने कोकण, गोवा आणि कर्नाटकाच्या किनारी भागांत अक्षरशः थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी अजूनही पडझड, रस्ता खचणे, घरांच्या भिंती कोसळणे, विजेचे खांब कोसळणे यासारख्या घटना घडतच आहे. काल रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर पकडल्याचे दिसत असून आज सकाळपर्यंत अनेक ठिकाणी परूसदृश स्थिती निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. 

हेही वाचा