प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, युवक ताब्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th July 2024, 11:28 pm
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, युवक ताब्यात

सांगे : तालुक्यातील नववीत शिकणाऱ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून २२ वर्षीय युवकाने बलात्कार केल्याची घटना घडली. त्या मुलीने सांगे पोलीस स्थानकात तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी त्या युवकाला अटक केली. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुलीशी प्रथम मैत्री करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर संधीचा फायदा घेऊन बलात्कार केला. सांगेचे पोलीस निरीक्षक प्रवीण गावस तपास करत आहेत. 

हेही वाचा