रुमडामळ येथे चोरी, अज्ञातांनी तीन कपाटे फोडत रोख रक्कम व दागिने केले लंपास

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
27th July, 04:43 pm
रुमडामळ येथे चोरी, अज्ञातांनी तीन कपाटे फोडत रोख रक्कम व दागिने केले लंपास

मडगाव : रुमडामळ हाउसिंग बोर्ड येथील श्याम चोडणकर यांच्या घरात कुणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश करत घरातील तीन कपाटांतील मौल्यवान वस्तू लंपास केल्या. मायना कुडतरी पोलिसांकडून घटनास्थळी तपास करण्यात येत आहे. घरमालक गोव्याबाहेर असल्याने नेमके किती नूकसान झाले याचा अंदाज वर्तवता येत नाही.  
राज्यात सध्या चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री रुमडामळ हाउसिंग बोर्ड येथील श्याम चोडणकर यांच्या घरात चोरी झाली. सध्या श्याम चोडणकर कुटुंबीयांसह बंगलोर येथे गेलेत. त्यांचे नातेवाईक मांजरांना खाऊ घालण्यासाठी सकाळी घरी आले असता घराचे गेट व दरवाजाही उघडा दिसला. शेजारी व नातेवाईकांनी पाहणी केल्यानंतर घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मायना कुडतरी पोलिसांना बोलावण्यात आले.
पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. नातेवाईक अविता चोडणकर यांनी, घरातील तीन कपाटे फोडण्यात आलेली आहेत. कपाटात ठेवलेले रोख रक्कम तसेच दागिने लंपास करण्यात आलेत. सोन्याचे दागिने व रोख रक्कम किती होती, हे घरातील मंडळी आल्यानंतरच कळणार आहे असे सांगितले. पोलीस तपास कार्य करत आहेत.  

हेही वाचा