राजस्थान : 'तुम्ही कोटाचे आहात; तेथे रहायचेय की नाही ?' काँग्रेस आमदाराची थेट सभापतींनाच धमकी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th July, 03:25 pm
राजस्थान : 'तुम्ही कोटाचे आहात; तेथे रहायचेय की नाही ?' काँग्रेस आमदाराची थेट सभापतींनाच धमकी

जयपूर : राजस्थान विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान काँग्रेस नेते आणि कोटा उत्तरचे आमदार शांती कुमार धारिवाल यांनी असंसदीय भाषा वापरली. काँग्रेसचे आमदार शांतीकुमार धारिवाल यांनी तर सभापतींना थेट धमकीच दिली. समोर आलेल्या माहितीनुसार २६ जुलै रोजी सभागृहात चर्चा सुरू होती. चर्चेदरम्यान विद्यमान मंत्री झबरसिंग खर्रा आणि माजी मंत्री शांती धारीवाल यांच्यात जमिनीच्या मुद्द्यावरून जोरदार वादावादी झाली. त्यावेळी झबरसिंग खर्रा यांनी धारीवाल यांच्यावर जमिनीच्या फायली गायब केल्याचा आरोप केला.राजस्थान: धारीवाल की जुबान फिसली...सदन में सभापति को दी गाली - Dainik Dehat

काय आहे संपूर्ण प्रकरण?

धारीवाल सभागृहात बोलत होते, तेव्हा सभापती संदीप शर्मा स्वत: अध्यक्षस्थानी होते. वेळेच्या मर्यादेचा संदर्भ देत त्यांनी शांती धारीवाल यांना त्यांचे म्हणणे संपवण्यास सांगितले परंतु पीठासीन अधिकाऱ्याकडे धारीवाल यांनी आणखी पाच मिनिटे मागितली. अजून ६५ जणांना आपले म्हणणे मांडायचे असल्याने हे शक्य होणार नाही असे सभापतींकडून उत्तर आले. काहीही असो मला अजून पाच मिनिटे लागतील, असे धारीवाल पुन्हा सभापतींना म्हणाले. Rajasthan Vidhan Sabha LIVE Update; Bhajan Lal Sharma BJP Vs Congress MLA |  Jaipur E Rickshaw | शांति धारीवाल ने विधानसभा में तीन बार कहे अपशब्द:  सभापति से बोले- कोटा में रहना

समोर आलेल्या माहितीनुसार,  धारीवाल यांनी सभापतींना  शिवीगाळ करत तुम्ही कोटाचे आहात, तुम्हाला कोटामध्ये राहायचे आहे की नाही? असा सवाल केला. विधानसभा अध्यक्षांना शिवीगाळ आणि धमकावण्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर लोक धारीवाल यांच्या एकंदरीत वागण्यावर लोक टीका करत आहेत.

Rajasthan Assembly: कोटा में रहना है ...

हेही वाचा