आसामच्या मोईदमचा जागतिक वारसा यादीत समावेश; अहोम राजवंशाशी आहे संबंध

अहोम राजघराण्याने १२२८ ते १८२६ इसवी पर्यंत आसाम आणि ईशान्येच्या काही भागांवर राज्य केले.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th July, 10:13 am
आसामच्या मोईदमचा जागतिक वारसा यादीत समावेश; अहोम राजवंशाशी आहे संबंध

दिसपुर : आसामच्या मोईदमचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे. ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आसामच्या मुख्यमंत्र्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मोइदम हे अहोम वंशाचे दफनस्थान आहे. स्थानिक लोक याला अतिशय पवित्र मानतात.Charaidev Maidam is a UNESCO World Heritage Site - Tarun Bharat

अहोम घराण्याने आसाम आणि ईशान्येच्या काही भागांवर १२२८ ते १२८६ इसवी पर्यंत राज्य केले. आसामच्या संस्कृतीवर या राजवंशाचा विशेष ठसा आहे. आसाम पूर्वेतील शिवसागर शहरापासून चराइदेव ३० किलोमीटर अंतरावर आहे. येथे बांधलेल्या या थडग्यांचे विशेष महत्त्व आहे. स्थानिक लोक याला पवित्र मानतात. या टेकडीवजा वास्तूला पाहण्यासाठी लांबून प्रवासी येतात.The Mysterious Mounds of the Ahoms

मोईदम म्हणजे काय?

सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाल्यास, मोईदम म्हणजे थडग्यावर बांधलेली एक खास टेकडी. ही टेकडी राजघराण्यातील आणि उच्चभ्रू लोकांचे दफनस्थान आहे.चराइदेव बद्दल बोलायचे झाले तर, येथे अहोम राजघराण्यातील प्रमुख शासकांचे थडगे आहेत. इतर मोईदम पूर्व आसाममध्ये, जोरहाट आणि दिब्रुगढ शहरांमधील परिसरात विखुरलेले आहेत. ६०० वर्षांपर्यंत, ताई-अहोमांनी टेकड्या, जंगले आणि पाण्याची नैसर्गिक स्थलाकृति निर्माण करण्यासाठी मोइडम्स बांधले.UNESCO adds Assam's Ahom Dynasty Moidams to World Heritage list | Today News

हिंदूंच्या विपरीत दफन प्रथा:

सामान्यतः हिंदू धर्मात मृत्यूनंतर मृतदेहाचे दहन करून अंत्यसंस्कार केले जातात, परंतु याउलट अहोम लोक दफनविधी पार पाडतात. ही वेगळी परंपरा ताई लोकांपासून निर्माण झाली. असे मानले जाते की थडगे जितके उंच असेल तितकेच मोठे त्यात दफन केलेल्या व्यक्तीचे कार्य आणि कर्तुत्व असेल.आतापर्यंत दोन मोईदामची ओळख पटली आहे. यातील एक गधाधर सिंह आणि दुसरा रुद्र सिंह यांचा आहे.  Moidams, Ahom dynasty's mound-burial system, included in Unesco World  Heritage List | India News - Times of India

मोईदमच्या आत काय आहे ? 

येथे विविध आकाराचे मोईदम सापडले आहेत. यामध्ये वीट, दगड किंवा मातीपासून बनविलेले पोकळ तळघर सापडले आहे. यामध्ये राजे आणि राजघराण्यातील इतर सदस्यांचे अवशेष आहेत. शासकाची पत्नी आणि अगदी नोकरांना अन्न, घोडे आणि हत्तींसह थडग्यात दफन करण्यात आले. या ढिगाऱ्यांच्या वर एक मंडप आहे, यास चौ-चाळी म्हणतात. काही ढिगाऱ्यांभोवती एक छोटी अष्टकोनी भिंतही आहे, जे प्रवेशद्वार आहे. चराइदेव मोईदम हे "आसामचा पिरॅमिड" म्हणूनही ओळखले जाते.Moidams' to be considered for World Heritage List - Rau's IAS

प्रथम चराइदेव या शब्दाचा अर्थ समजून घ्या. चराइदेव हा शब्द तीन ताई अहोम शब्दांपासून बनला आहे. हे शब्द आहेत चे-राय-दोई. "चे" म्हणजे शहर, राय म्हणजे 'चमकणे' तर डोई म्हणजे टेकडी. अशा प्रकारे चराइदेव म्हणजे टेकडीच्या माथ्यावर वसलेले एक चमकणारे शहर. अहोम घराण्याने चराइदेव  ही पहिली राजधानी बनवली. अहोम वंशाचा राजा सुकाफा याने १२५३ मध्ये चराइदेवची स्थापना केली. त्यांच्यावर चराइदेव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळेच नंतरच्या राज्यकर्त्यांनाही येथे दफन करण्यात आले.Moidams of Assam's Ahom dynasty included in UNESCO World Heritage List

अहोम कोण होते?

आहोम हे भारतातील प्रदीर्घ काळ राज्य करणाऱ्या राजवंशांपैकी एक होते. त्याचे साम्राज्य सध्याच्या बांगलादेशपासून बर्मा किंवा म्यानमारच्या अंतर्गत भागापर्यंत विस्तारले होते. अहोम शासकांना केवळ शूरच नव्हे तर ज्ञानी शासकही मानले जात होते. त्यामुळेच आजही आसामच्या संस्कृतीत त्यांची छाप कायम आहे.Ahom King Suhungmung and The Story of A Prince in Naga Hills

हेही वाचा