अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फादर फ्रिन्सिस दिब्रिटो काळाच्या पडद्याआड

फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ९३व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
25th July, 09:49 am
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फादर फ्रिन्सिस दिब्रिटो काळाच्या पडद्याआड

मुंबई : सुप्रसिद्ध साहित्यिक,थोर विचारवंत व ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे वयाच्या ८० व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. वसईतील नंदाखाल येथे राहत्या घरी त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निधनाने उमदा मराठी साहित्यिक आणि विचारवंत काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे मराठी साहित्य विश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो: 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष  - BBC News मराठी

 फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म ४  डिसेंबर १९४२ रोजी वसई तालुक्यातील नंदाखाल या गावी झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बीए, तर धर्मशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. सन १९७२ मध्ये त्यांनी कॅथलिक धर्मगुरु पदाची दीक्षा घेतली. गुंडशाहीविरुद्ध आवाज उठवणारे कार्यकर्ते, पर्यावरणाचे रक्षणकर्ते, सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची बहुआयामी ओळख निर्माण झाली.हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली होती. 

father francis dibroto elected as president of 93rd akhil bhartiya marathi  sahitya sammelan osmanabad | 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या  अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो

 शिवाय 'सुवार्ता' या मासिकाद्वारे फादर दिब्रिटो यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक विविध विषय मांडले. त्यासाठी त्यांनी काही उपक्रमही राबवले. त्यांच्या या कार्यामुळेच सुवार्ता हे मासिक केवळ ख्रिस्ती धर्मियांसाठी न राहता मराठी साहित्य विश्वातही या मासिकाचा स्वतंत्र असा ठसा उमटवला गेला. १९८३ ते २००७ या काळात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सुवार्ताचे मुख्य संपादकपद सांभाळले. 

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो -  Marathi News | Father francis dbritto elected as akhil bhartiya marathi  sahitya sammelan president | TV9 Marathi

 'संघर्षयात्रा ख्रिस्तभूमी'ची हे पुस्तक लिहिण्यासाठी फादर दिब्रिटो हे इस्रायलमध्ये गेले होते. तेथे राहून त्यांनी यावर काही काळ संशोधनही केले. 'सुबोध बायबल- नवा करार' या पुस्तकासाठी २०१३ सालच्या साहित्य अकादमी राष्ट्रीय अनुवाद पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. उस्मानाबाद येथे ( आताचे धाराशिव ) पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद  फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी भूषवले आहे.

93rd Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan From Today Under The Shadow  Of A Conflict - विरोधाच्या सावटाखाली आजपासून साहित्य संमेलन | Maharashtra  Times

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनेक संघटनांनी याविरोधात आवाज उठवला होता. यावर प्रतिक्रिया देतांना ' मी अस्सल भारतीय आहे, अस्सल महाराष्ट्रीयन आहे. मला माझी ओळख सिद्ध करण्याची गरज नाही. माझी नाळ मराठीशी जोडली गेलेली आहे, अशा शब्दात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी विरोधकांना फटकारले होते.  

ज्याच्या काळजातून काटा आरपार जातो आणि त्या काट्याची लेखणी करून जो लिहितो,  अशी साहित्यकृती अभिजात पदाला पोहोचते.

त्यावेळी याविषयी बोलताना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष रावसाहेब कसबे म्हणाले होते की, मराठी विचारविश्व एखाद्या डबक्यासारखे राहावे, अशी खूप लोकांची इच्छा आहे. त्या डबक्याचे नदीत रूपांतर होत असताना त्यात थोडे अडथळे, दगड-धोंडे येतातच. पण, ही नदी त्या सगळ्यांचा स्वतःसोबत घेऊन पुढे जाणार आहे. फादर यांना विरोध करणे आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे. त्यांचाबद्दल जे शब्द वापरले जात आहेत ते योग्य नाहीत. फादर एक भूमिका घेणारे उत्तम लेखक आहेत. म्हणून ते संमेलनाचे अध्यक्ष होण्यास पात्र ठरले. Francis Debreto Passes Away to illness at his home |अखिल भारतीय मराठी  साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची साहित्य संपदा :

*आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा

*ओअ‍ॅसिसच्या शोधात

*ख्रिस्ताची गोष्ट (चरित्र)

* संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास

*सुबोध बायबल - नवा करार

*नाही मी एकला 

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी मराठीच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपले कार्य शेवटपर्यंत सुरू ठेवले होते.


समोर आलेल्या माहितीनुसार फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे मागील काही दिवसांपासून दिर्घ आजाराशी लढत होते. त्यांच्यावर वांद्र्यातील एका रुग्णालयात उपचारही सुरू होते. मात्र उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे पार्थिव जेलाडी इथल्या त्यांच्या राहत्या घरी दुपारी तीन वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे.

93rd Sahitya Sammelan Father Francis Dibrito return to mumbai due to  unwealth | साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो प्रकृती अस्वास्थामुळे  मुंबईत परतले

त्यानंतर नंदाखेल इथल्या चर्चमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तियांनी दिली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येतील. 


हेही वाचा