पूजा खेडकरने पालक विभक्त झाल्याचा खोटा दावा करत घेतला ओबीसी नॉन क्रिमी लेअरचा लाभ

पूजाने यूपीएसएसी परीक्षेत इतर मागासवर्गीय नॉन-क्रिमी लेअर कोट्याचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेतल्याचे आरोप केले जात आहेत. दरम्यान याबाबत केंद्र सरकारने पुणे पोलिसांकडून अधिक माहिती मागवली आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
24th July, 02:46 pm
पूजा खेडकरने पालक विभक्त झाल्याचा खोटा दावा करत घेतला ओबीसी नॉन क्रिमी लेअरचा लाभ

पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भात नुकत्याच समोर आलेल्या एका तक्रारीनुसार, पूजा यांनी परीक्षेदरम्यान भरलेल्या अर्जावर आपले पालक विभक्त झाल्याची चुकीची माहिती देत इतर मागासवर्गीय नॉन-क्रिमी लेअर कोट्याचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेतला आहे.पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने पुणे पोलिसांना पूजा खेडकरच्या पालकांच्या वैवाहिक स्थितीची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. Are Puja Khedkar's parents divorced?': Pune police begin probe after  Centre's instructions | Pune News - The Indian Express

परीक्षेच्या नियमानुसार ज्या उमेदवारांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी आहे तेच लोक इतर मागासवर्गीय नॉन-क्रिमी लेअरच्या श्रेणीत येतात. पूजाने केलेल्या दाव्यानुसार तिचे आई-वडील वेगळे झाले असून ती आईसोबत राहत होती. तर तिचे वडील सरकारी नोकरीत क्लास वन अधिकारी होते. आता एकंदरीत प्रकरणात बरेच धक्कादायक खुलासे झाल्यामुळेच केंद्र सरकारने पुणे पोलिसांना याही दृष्टिकोनातून पूजा खेडकरच्या आई-वडिलांचे वैवाहिक जीवन आणि स्थिती याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.Manorama Khedkar Donated ₹12 Lakh to Pankaja Munde's Gopinath Foundation |  TheBridgeChronicle

पूजा खेडकर यांना बनावट अपंगत्व प्रमाणपत्र मिळवून देण्यात मदत करणाऱ्या डॉक्टर आणि सहाय्यकांच्या विरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्या सर्वांची चौकशी करण्याचे आदेश अपंग कल्याण विभागाच्या आयुक्तांनी दिले आहेत. पूजा खेडकर यांना प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय विभागावर कारवाई करण्यासाठी पिंपरी महापालिकेच्या समितीला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.Puja Khedkar Latest News, Photos, Videos and Analysis- Indiatoday

वायसीएम हॉस्पिटलद्वारेच पूजा खेडकरला अपंगत्व प्रमाणपत्र जारी करण्यात आले होते.यात पूजाला तिच्या डाव्या गुडघ्यात ७ टक्के कायमचे अपंगत्व असल्याचे नमूद केले होते. तपासात दोषी आढळल्यास डॉक्टर आणि अपंगत्व प्रमाणपत्र देणाऱ्या सर्व व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येईल. तपासाचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला जाणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर गेल्या ५ दिवसांपासून नॉट रीचेबल असून, त्या वाशिम येथून पुण्याला निघाल्या होत्या पण वाटेतच दुसरीकडे निघून गेल्या. त्यांना २३ जुलै रोजी मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रात हजर होण्याचे निर्देश देण्यात आले होते तेथे देखील त्या गैरहजर राहिल्या. येत्या काळात त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले जाण्याची शक्यता आहे.

Centre Asks Pune Cops To Give Details Of Trainee IAS Puja Khedkar's Parents'  Marital Status


हेही वाचा