डीआरडीओ करणार क्षेपणास्त्र चाचणी; १० गावांतील तब्बल २० हजार लोकांचे केले स्थलांतरण

स्थलांतरित केलेल्या गावांतील लोकांसाठी तात्पुरती छावण्या उभारण्यात आल्या आहेत अशी बालासोर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
24th July, 12:17 pm
डीआरडीओ करणार क्षेपणास्त्र चाचणी; १० गावांतील तब्बल २० हजार लोकांचे केले स्थलांतरण

बालासोर : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील १० गावांतील सुमारे २० हजार लोकांना तात्पुरते इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे. २३ जुलै रोजी झालेल्या बैठकीत या लोकांना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पहाटे ४ वाजेपर्यंत घरे रिकामी करण्याचे आदेश दिले होते. शिबिरातील वास्तव्यादरम्यान त्यांना रोजचा भत्ता आणि जेवणाचे पैसेही दिले जातील.Missile testing in Balasore

डीआरडीओ क्षेपणास्त्राची चाचणी घेणार आहे

डीआरडीओ बुधवारी क्षेपणास्त्राची चाचणी घेणार आहे. त्यामुळे साडेतीन किलोमीटरच्या परिसरात येणारी गावे सुरक्षिततेच्या दृष्टीने रिकामी करण्यात आली आहेत. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही क्षेपणास्त्र चाचणी ओडिशाच्या चांदीपूर आयटीआर रेंजमध्ये घेतली जाणार आहे. अशा परिस्थितीत डीआरडीओने क्षेपणास्त्र चाचणीसाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली आहे. ही चाचणी आयटीआरच्या लाँच पॅड ३ वरून केली जाईल. मात्र, चाचणी करण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्राचे नाव किंवा त्याच्याशी संबंधित कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.Integrated Test Range campaigns for green and clean India

 लोकांना तात्पुरत्या शिबिरात पाठवले

बालासोर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे की, स्थलांतरित झालेल्या गावांतील लोकांसाठी तात्पुरती छावण्या उभारण्यात आल्या आहेत. तात्पुरत्या शिबिरात या लोकांना झालेल्या गैरसोयीची भरपाईही दिली जाईल. याशिवाय शिबिरात लोकांना खाण्यापिण्यापासून ते आरोग्याशी निगडीत सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.Balasore: PDS Control dealer made to walk 3 km for stopping ration supply

भरपाई मिळेल

मच्छीमार आणि मजुरांनाही जिल्हा प्रशासन भरपाई देणार आहे.  प्रौढांना दररोज ३००  रुपये, अल्पवयीनांना १५० रुपये आणि जेवणासाठी ७५  रुपये दिले जाणार आहेत.Integrated Test Range - Wikipedia


हेही वाचा