केरळमध्ये निपाह व्हायरसचा उद्रेक;आतापर्यंत ५ जणांना लागण

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात एका १४ वर्षीय तरुणाला निपाह व्हायरसची लागण झाली आहे. केरळमधील निपाह व्हायरसची ही पाचवी घटना आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
21st July 2024, 12:44 pm
केरळमध्ये निपाह व्हायरसचा उद्रेक;आतापर्यंत ५ जणांना लागण

मलप्पुरम : चांदीपुरा व्हायरसनंतर देशात  निपाह विषाणूने पुन्हा प्रवेश केला आहे. त्याची सुरुवात केरळपासून झाली आहे. केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात एका १४ वर्षीय तरुणाला निपाह व्हायरसची लागण झाल्याची आहे. केरळमधील निपाह व्हायरसची ही पाचवी घटना आहे. राज्यात या विषाणूबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार निपाहचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष उपाय योजना राबवल्या जात आहेत. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी मलप्पुरम जिल्ह्यात निपाह व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली.Nipah: A team of Kerala doctors helped detect the presence of the deadly  virus in record time

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी लोकांना वटवाघळांचा अधिवास नष्ट करण्याचे आवाहन केले होते. २०१८ मध्ये केरळमधील कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यात याच निपाह व्हायरसमुळे सुमारे १७ लोकांचा मृत्यू झाला होता.

प्राणघातक उद्रेकानंतर तीन वर्षांनंतर, केरळमध्ये निपाह विषाणूचे पुनरुत्थान; राज्य अलर्टवर

निपाह विषाणूमुळे होणारा आजार प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो. त्याला 'झुनोटिक' रोग म्हणतात. मलेशियातील कंपुंग सुंगाई निपाह येथे १९९८ मध्ये याचा प्रभाव प्रथम आढळून आला, म्हणून त्याला निपाह असे नाव पडले. संक्रमित व्यक्तीला खूप ताप आणि डोकेदुखीचा त्रास होतो. यामुळे कोणतीही व्यक्ती कोमातही जाऊ शकते. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जाण्यापूर्वी मास्क घालावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपाय योजना करावी. केरळमध्ये निपाह व्हायरस अलर्ट: स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे - इंडिया टुडे

हेही वाचा