आसगाव प्रकरण : पूजा शर्माचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
10th July, 04:54 pm
आसगाव प्रकरण : पूजा शर्माचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

पणजी : आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीय राहत असलेल्या घराचा भाग जमीनदोस्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्यसूत्रधार पूजा शर्मा यांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. याबाबतचा आदेश न्या. ईर्शाद आगा यांनी दिला.

आसगाव येथील सर्व्हे क्रमांक १३५/१ए मधील जमिनीत आगरवाडेकर कुटुंबीय राहत असलेल्या घराचा भाग २२ जून रोजी दुपारी पाडण्यात आला होता. त्यासाठी जेसीबी आणि बाउन्सरचा वापर करण्यात आला होता. याशिवाय

आगरवाडेकर पिता-पुत्राच्या अपहरण  करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणी हणजूण पोलिसांनी मुख्य सूत्रधार पूजा शर्मा याच्यासह इतरांविरोधात ३६५, ४२७ व ३४ या कलमांखाली गुन्हा नोंद केला. त्यानंतर हे प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले. गुन्हा शाखेने याप्रकरणी आता भा.दं.सं.ची ४४०, ४४७, ४४८, ३५२, ३५४, १४३, १४७, १४८ व १४९ ही अतिरिक्त कलमे जोडली आहेत.

या प्रकरणात हणजूण पोलिसांनी जेसीबी चालक प्रदीप राणा व रिअल इस्टेट एजंट अर्शद ख्वाजा यांना, तर गुन्हा शाखेने एका चालकासह पाच बाउन्सरना अटक केली होती.त्यानंतर सर्व संशयितांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. याच दरम्यान हणजूण पोलिसांनी २५ जून रोजी पूजा शर्मा यांना चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती.हे प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग केल्यानंतर शर्मा यांना २८ जून रोजी नोटीस बजावून १ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले होते. त्यावेळी शर्मा हिने आपण महाराष्ट्राच्या बाहेर अमृतसर आणि हिमाचल प्रदेशात असल्यामुळे हजर राहू शकणार नसल्याची माहिती दिली. तसेच जुलैच्या दुसरा आठवड्यात आपल्याला हजर राहण्यास तारीख निश्चित करण्याची विनंती केली

याच दरम्यान पूजा शर्मा यांनी सोमवार १ जुलै रोजी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी जाली असता, शर्मा यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील सुरेंद्र देसाई यांनी युक्तिवाद मांडला. त्यावेळी त्यांनी आगरवाडेकर यांच्या घराचा भाग जमीनदोस्त तसेच पिता-पुत्राच्या अपहरण प्रकरणात आपल्या अशीलाचा सहभाग नसल्याचा दावा केला. तसेच वरील मालमत्ता क्रिस पिंटो यांच्याकडून ५ ऑगस्ट २०२३ रोजी खरेदी केली होती. त्यानंतर या संदर्भात ८ सप्टेंबर २०२३ रोजी निबंधकाकडे प्रक्रिया करण्यात आली आहे अशी देखील माहिती न्यायालयात देण्यात आली. दरम्यान २०२४ मध्ये ती गोव्यात आली नाही. हे प्रकरण राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. मालमत्तेचा विषय दिवाणी स्वरूपाचा असून शर्मा यांना त्यात नाहक गुंतवण्यात आल्याचा युक्तिवाद केला.

दरम्यान गुन्हा शाखेतर्फे सरकारी अभियोक्ता दर्शन गावस यांनी बाजू मांडली. त्यानुसार, आगरवाडेकर कुटुंबीय राहत असलेल्या घराचा भाग जमीनदोस्त करण्यात आला आहे व या घटनेची मुख्य सूत्रधार पूजा शर्मा असून तीच लाभार्थी आहेत. त्यामुळे तिच्या आणि इतर संशयितांमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहार व इतर गोष्टींचा उलगडा होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तिची पोलीस कोठडी आवश्यक असून तिने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याचा युक्तिवाद सरकारी अभियोक्ता दर्शन गावस यांनी न्यायालयात केला.या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू एकून घेतल्यानंतर पूजा शर्मा यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.

 

हेही वाचा