गाझा पुन्हा इस्रायलच्या निशाण्यावर;रणगाड्यांद्वारे हल्ला; तब्बल २९ पॅलेस्टिनी नागरिक ठार

गाझामध्ये इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा भीषण युद्ध सुरू झाले आहे. इस्रायली सैन्याने दक्षिण गाझा शहरात प्रवेश केला असून, रणगाड्यांद्वारे हल्ला केला जातोय. दरम्यान, २९ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. यावेळी अनेक इस्रायली सैनिकांना ठार केल्याचा दावा हमासही केला आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th July, 11:05 am
गाझा पुन्हा इस्रायलच्या निशाण्यावर;रणगाड्यांद्वारे हल्ला; तब्बल २९ पॅलेस्टिनी नागरिक ठार

तेल अविव : इस्रायलने दक्षिण गाझा पट्टीतील एका शाळेवर मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात मुलांसह तब्बल २९  जणांचा मृत्यू झाला आहे. गाझा शहरावर इस्रायली रणगाड्यांनीकूच केली असून हजारो रहिवाशांना भीषण युद्धजन्य परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. इस्रायलने मंगळवारी हा आक्रमक हल्ला केला. यामुळे युद्धविराम चर्चा मात्र धोक्यात येऊ शकते. In pictures: Israel pummels Gaza after Hamas attack - October 11, 2023 |  Reuters

पॅलेस्टिनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गाझामधील खान युनिसच्या पूर्वेकडील अबासन शहरातील एका शाळेबाहेर विस्थापित कुटुंबांच्या तंबूंवर इस्रायली सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान २९ लोक मारले गेलेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. इस्त्रायली सैन्याने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात नागरिकांच्या हानीच्या अहवालांचे पुनरावलोकन सुरू असल्याचे सांगितले.Hamas says will kill hostages if Israeli attacks on Gaza civilians continue

हमासच्या सैनिकांवर इस्रायलने "प्रिसिजन ॲम्युनिशन" गोळीबार केल्याने ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, इस्रायलने मंगळवारी मध्य गाझा भागात केलेल्या हल्ल्यात तब्बल ६० पॅलेस्टिनी नागरिक ठार आणि इतर डझनभर जखमी झालेत, असे एक विस्तृत बुलेटीन जारी करत हमास संचालित गाझा सरकारच्या मीडिया कार्यालयाचे संचालक इस्माइल अल-थवाबता यांनी सांगितले.Timeline of Deadly Attacks in Israel and Response in Gaza - The New York  Times

 इस्रायली रणगाड्यांनी गाझा शहरातील तेल अल-हवा, शेजैया आणि साब्रा भागात रस्त्यांवर आणि इमारतींवर भीषण हल्ला केला. जीव वाचवण्याकरिता लोकांना घरे सोडून पळून जाण्यास भाग पाडले. यानंतर इस्रायली लष्कराने सोशल मीडियावर पूर्व आणि पश्चिम गाझा शहरातील अनेक जिल्हे रिकामे करण्याचे आदेश दिले. थवाबता यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, या भीषण हल्ल्यासाठी पेलेस्टाईन अमेरिकन प्रशासनाला जबाबदार धरतो.Death toll from Israeli attacks on Gaza rises to 181 | Daily Sabah

पॅलेस्टिनी रेड क्रिसेंटने बुधवारी पहाटे फेसबुकवर केलेल्या पोस्ट नुसार  त्यांच्या कर्मचाऱ्यांना गाझा शहरातून डझनभर 'एसओएस' कॉल आले होते, परंतु तेथे भीषण परिस्थिती असल्यामुळे ते मदत करू शकले नाहीत. हमास आणि  इस्लामिक जिहादच्या सशस्त्र शाखेने दिलेल्या संयुक्त निवेदनात जारी केलेल्या माहितीनुसार,  त्यांच्या सैनिकांनी इस्रायली सैन्याशी मशीन गन, मोर्टार फायर आणि अँटी-टँक क्षेपणास्त्रांसह जोरदार लढा दिला, यात ५ इस्त्रायली सैनिक ठार तर अनेक जखमी झाले. Israel strikes dense Gaza camp, says it kills Hamas commander | Reuters 

हेही वाचा