कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या पूर्ववत सुरू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th July, 12:36 am
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या पूर्ववत सुरू

पेडणे : मालपे पेडणे रेल्वे स्टेशनच्या बोगद्यात काही प्रमाणात चिखल साचल्याने सर्व रेल्वे सावंतवाडी येथे थांबवण्यात आल्या होत्या. कोकण रेल्वे मार्गावरील पेडणेतील बोगद्यातील देखभालीचे काम व्यवस्थापकीय संचालकांच्या उपस्थितीत पूर्ण झाले. यानंतर वाहतूक पूर्ववत झाली असून प्रवाशांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यात आली. गाड्यांसंदर्भात स्थानकांवरून माहिती देण्यास सुरुवात केली आहे. गेले चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील खाजणे- मालपे (पेडणे) टनेलमध्ये पाणी व चिखल भरल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यानंतर गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या सिंधुदुर्गमधील काही स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. तर, गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गोव्यात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. टनेलमध्ये रेल्वेचे इंजिनिअर पाहणीसाठी गेले होते. तोपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली आहे. यानंतर मंगळवारी रात्री बोगद्यातील देखभालीचे काम व्यवस्थापकीय संचालकांच्या उपस्थितीत पूर्ण झाल्यावर वाहतूक पूर्ववत झाली.

हेही वाचा