'या' कॉलेजमध्ये सुरु झालंय ड्रेस कोडचे बंधन

नियम न पाळल्यास कॉलेज आवारात फिरू देणार नाही! कॉलेजकडून नोटीस जारी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd July, 12:37 pm
'या' कॉलेजमध्ये सुरु झालंय ड्रेस कोडचे बंधन

मुंबई: शाळा आणि धार्मिकस्थळी ड्रेस कोडचे बंधन असावं कि नसावं याबाबत अनेकदा वाद निर्माण झाल्याच्या घटना देशात अनेक ठिकाणी घडल्या होत्या. भारताव्यतिरिक्त मध्य आशियातील मुस्लीमबहुल देशात संसदेने हिजाब आणि बुरख्यासारख्या इस्लामिक पोशाखावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. याच संदर्भात मुंबईहून एक बातमी हाती येतेय.No jeans and t-shirts jersy in college chembur acharya marathe college news  circular | Mumbai News: आधी हिजाब बंदी आता चेंबूरच्या आचार्य-मराठे  कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जीन्स, टी ...

मुंबईतील चेंबूरमध्ये असलेल्या आचार्य मराठे कॉलेजने ड्रेस कोड बाबत निर्णय घेत हिजाब बंदीनंतर आता जिन्स, टी शर्ट, जर्सी आणि तोकडे कपडे घातलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या आवारात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. कॉलेजने या निर्णयासंदर्भात एक पत्रक काढत विद्यार्थ्यांसाठी ड्रोस कोडबाबत सूचना दिल्या आहेत.Ways This University Is Helping Students Find Their Purpose, 50% OFF

सध्या जीन्स आणि टी-शर्ट हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक सामान्य पोशाख बनला असून महाविद्यालयाच्या या निर्णयामुले विद्यार्थीवर्गात नाराजीचे वातावरण पसरले आहे. कॉलेजने 'ड्रेस कोड आणि इतर नियम' नावाची नोटीस जारी केली आहे. जून महिन्याच्या अखेरीस जारी करण्यात आलेल्या या नोटीसमध्ये कॅम्पसमध्ये फाटलेल्या जीन्स, टी-शर्ट, रिलीव्हिंग ड्रेस आणि जर्सी परिधान करण्यास मनाई असल्याचे म्हटले आहे.

मुली पारंपारिक पोशाख किंवा पाश्चात्य पोशाख घालू शकतात परंतु तुमची धार्मिक ओळख दर्शवणारे कोणतेही कपडे घालू नये असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी फॉर्मल आणि सभ्य कपडे परिधान करावेत, तसेच हिजाब, बुरखा, तोकडे कपडे, धार्मिकता दर्शवणारी टोपी आणि बॅज कॉमन रूममध्ये काढून ठेवावे. नियमांचे पालन न केल्यास विद्यार्त्यांना कॉलेज आवारात फिरता येणार नसल्याचे या नोटिशीत म्हटले आहे.