गुजरातमधील संशयितांना कळंगुटमध्ये अटक

१.४० कोटी रूपये फसवणूक प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th July, 12:34 am
गुजरातमधील संशयितांना कळंगुटमध्ये अटक

म्हापसा : नवसारी गुजरात येथे ऑनलाईन बनावट कॉल सेंटरद्वारे क्रिफ्टो करन्सी मार्फत लोकांना १.४० कोटी रूपयांचा गंडा घालणाऱ्या दोघा भावांना कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. रूद्रदुत्त उर्फ मायकल व गज्जू अशी या संशयितांची नावे असून ते जोधपूर येथील रहिवासी आहेत.

गुजरातमधील नवसारी सायबर क्राईम पोलीस स्थानकाच्या हद्दीत पोलिसांनी एका बनावट ऑनलाईन कॉल सेंटरचा पदार्फाश केला. सदर कॉल सेंटर मार्फत संशयितांनी विदेशी लोकांना १ कोटी ४० लाखांचा गंडा घातला होता. ही रक्कम संशयितांनी क्रिफ्टो करन्सीद्वारे संशयितांनी घेतली होती.

या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रूद्रदुत्त उर्फ मायकल व गज्जू हे असल्याचे पोलीस चौकशीत आढळून आले होते. संशयितांविरूध्द नवसारी पोलिसांनी भा.दं.सं.मया ३८८, १७०, १७१, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४२८, १२०(ब) व ३४ तसेच माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६६(क) व ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
फरार संशयित आरोपी गोव्यात पसार झाल्याचे व ते कळंगुट भागात असल्याची माहिती नवसार पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार गुजरात पोलिसांनी कळंगुट पोलिसांनी संपर्क साधला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी ३ जुलै रोजी संध्याकाळी संशयित आरोपींना पकडून अटक केली. पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांमया मार्गदर्शनाखाली व निरीक्षक परेश नाईक यांमया नेतृत्वाखाली हवालदार विद्यानंद आमोणकर, कॉन्सटेबल अमीर गरड व सहकारी पथकाने ही कामगिरी केली.                

हेही वाचा