पाच वर्षांत सरकारने शेतकऱ्यांना दिल्या ५,०५१ गायी, म्हशी!

पशुपालन-पशुसंवर्धन खात्याकडून ३३.३१ कोटींचा खर्च

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th July, 12:32 am
पाच वर्षांत सरकारने शेतकऱ्यांना दिल्या ५,०५१ गायी, म्हशी!

पणजी :आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा मोहीम सुरू केल्यापासूनच्या पाच वर्षांत पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याने कामधेनू, सुधारित कामधेनू या योजनांअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ५,०५१ गायी आणि म्हशी दिल्या असून, त्यासाठी ३३.३१ कोटी खर्च केले आहेत.
विविध गोष्टींसाठी नेहमीच इतर राज्यांवर अवलंबून राहणाऱ्या गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्याच्या हेतूने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २ ऑक्टोबर २०१९ रोजी आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा मोहिमेची घोषणा केली. योजनेच्या पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कृषी क्षेत्र केंद्रस्थानी ठेवून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कृषी आणि दूध उत्पादन वाढवण्यावर भर दिला. दूध उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना कामधेनू, सुधारित कामधेनू या योजनांअंतर्गत गायी, म्हशी देण्यास सुरुवात केली. सरकारच्या या योजनांना गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांकडूनही समाधानकारक प्रतिसाद मिळालेला आहे. या पाच वर्षांत ५,०५१ शेतकऱ्यांनी सबसिडीचा फायदा घेत गायी आणि घेतल्याचे पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मायक्रोचीप असलेली एकही गाय-म्हैस रस्त्यावर नाही!
- पशुपालन आणि पशुसंर्वधन खात्याकडून वितरित केल्या जाणाऱ्या गायी, म्हशींच्या कानांमध्ये मायक्रोचीफ बसवण्यात आल्या आहेत.
- गायी, म्हशी घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांना रस्त्यांवर सोडून देऊ नये, यासाठी या चीफ बसवण्यात आल्या असून, त्यात संबंधित शेतकऱ्याचा आधारकार्ड नंबर, मोबाईल क्रमांक व इतर माहिती आहे.
- खात्याने आतापर्यंत ज्या ५,०५१ गायी, म्हशी दिल्या आहेत, त्यातील एकही जनावर रस्त्यावर आढळल्याची तक्रार आलेली नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
- असे प्रकार समोर आल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या सरकारी योजना बंद करण्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काहीच दिवसांपूर्वी दिला होता.
दिलेल्या गायी/म्हशी व झालेला खर्च
वर्ष           गायी/म्हशी      खर्च (कोटींत)
२०१९-२०      १,५९४           १०.५२
२०२०-२१      ६६६           ४.२५
२०२१-२२      १,७३९           ११.२१
२०२२-२३      ७२९           ४.८७
२०२३-२४      १३७           १.०३
२०२४-२५      १८६           १.४३
एकूण           ५,०५१           ३३.३१     
                   

हेही वाचा