पोलीस अधीक्षक कार्यालयातच पत्नीचा चाकू भोसकून खून

कौटुंबिक कलहामुळे कॉन्स्टेबल पतीने उचलले पाऊल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd July, 10:59 am
पोलीस अधीक्षक कार्यालयातच पत्नीचा चाकू भोसकून खून

बंगळूर : कौटुंबिक कलहामुळे जीवे मारण्याची धमकी देण्याच्या किंवा प्रत्यक्षात जीव घेण्याच्या अनेक घटना देशात घडत असून नुकतीच एक घटना बंगळूर येथे घडली आहे. कौटुंबिक  वादाच्या पार्श्वभूमीवर हासन पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच हवालदारपदी कार्यरत असलेल्या लोकनाथने आपल्या पत्नीचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याघटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव ममता (वय ३८) असे असून हासन शहराबाहेरील चन्नपट्टण येथे राहणाऱ्या ममताने १७ वर्षांपूर्वी के. आर. पुरमच्या लोकनाथशी लग्न केले होते.

Bengaluru: Constable Stabs Wife to Death in SP Office

ममता आणि लोकनाथ यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरु असून अनेकदा त्यांची भांडणे होत होती. दरम्यान सोमवारी त्यांच्यात पुन्हा वादावादी होऊन  संतापलेल्या ममताने पोलिसांत पती लोकनाथ यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. पत्नी पोलिस अधीक्षक कार्यालयात आल्याचे समजताच त्याच लकार्यालयात हवालदारपदी कार्यरत असलेल्या लोकनाथ याने आपल्या पत्नीच्या छातीवर चाकूने वार केले आणि पळ काढला.

Karnataka: Hassan cop kills stabs wife to death outside Shanthigram Police  station - India Today

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ममता कार्यालयातच कोसळल्या. तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांनी तत्काळ ममता यांना जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पत्नीचा खून करून पळून गेलेला आरोपी पती लोकनाथ याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. ममता आणि लोकनाथ यांना दोन मुले आहेत.