आजपासून जीओ सिनेमावर बिग बॉस ओटीटी सीझन ३

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st June, 12:14 am
आजपासून जीओ सिनेमावर बिग बॉस ओटीटी सीझन ३


रिॲलिटी शो बिग बॉस ओटीटी सीझन ३ पासून जेसिका अल्बा अभिनीत नेटफ्लिक्सचा नवीन ॲक्शन थ्रिलर ट्रिगर वॉर्निंग आज ओटीटीवर झळकणार आहेत. तसेच सिनेमागृहांमध्ये आपल्याला अॅक्शन, कॉमेडी, अॅनिमेटेड चित्रपट अनुभवायला मिळणार आहेत. ओटीटीवर अरनमानाई ४, गँग्स ऑफ गॅलिसिया, बॅड कॉपसारखे चित्रपट आजपासून आपण पाहू शकता.


एनीवन बट यू : अॅमेझॉन प्राईम :
हा एक रॉमॅंटिक कॉमेडी चित्रपट आहे. बेन आणि बियाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला, परंतु नंतर ते ऑस्ट्रेलियातील एका विवाह सोहळ्यात एकमेकांना भेटतात. जिथे ते एक परिपूर्ण जोडपे असल्याचे भासवतात. सिडनी स्वीनी आणि ग्लेन पॉवेल अभिनीत या वीकेंडला तुमच्या जोडीदारासोबत पाहण्याचा एक उत्तम पर्याय आहे.

अरमानाई ४ : डिस्ने+ हॉटस्टार : हॉरर कॉमेडी चित्रपटांना मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादामुळे अरमानाईच्या निर्माते तमन्ना भाटिया, सुंदर, राशी खन्ना आणि योगी बाबू अभिनीत चौथा भाग आज हॉटस्टारवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. सुंदर दिग्दर्शित हा तमिळ चित्रपट एका मध्यमवयीन माणसाभोवती फिरतो, जो आपल्या बहिणीच्या रहस्यमय मृत्यूमागील सत्य उघड करण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतो.


बिग बॉस ओटीटी सीझन ३ : जिओसीनेमा : अनिल कपूर बिग बॉस ओटीटी सीझन ३ च्या तिसऱ्या सीझनचे होस्ट करण्यासाठी सज्ज आहे. जो लोकप्रिय भारतीय रिॲलिटी शो बिग बॉसवर आधारित आहे. आगामी रिॲलिटी शोमध्ये अनेक सेलिब्रिटी, प्रभावशाली आणि टीव्ही कलाकार सहभागी होताना पाहता येणार आहे.


बाइकराइडर्स : थिएटर्स :जोडी कॉमर, ऑस्टिन बटलर आणि टॉम हार्डी यांच्या प्रमुख भूमिका असलेला, हा क्राइम थ्रिलर मिडवेस्टर्न मोटरसायकल क्लब, वँडल्स एमसीची कथा सांगतो, जो गुन्हेगारी सिंडिकेटमध्ये सामील होतो. सर्व गोंधळात, त्याला कॅथी भेटते आणि त्याचे जीवन अनपेक्षीत वळण घेते.


गँग्स ऑफ गॅलिशिया : नेटफ्लिक्स :मिस्ट्री थ्रिलर्सच्या चाहत्यांसाठी नेटफ्लिक्स गँग्स ऑफ गॅलिशिया घेऊन आले आहेत. ही मालिका एका वकिलाभोवती फिरते. जिचे आयुष्यात उलथापालथ होते, जेव्हा तिला कळते की तिच्या वडिलांचे गॅलिशियन ड्रग कार्टेलशी संबंध आहेत. तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर कथानकाला वेगळे मनोरंजक वळण मिळते. क्लारा लागो आणि तामार नोव्हास यांच्या प्रमूख भूमिका या मालिकेत आहेत.


बोका बकशोते बोंडी : होइचोई: बोका बकशोते बोंडी ही एक बंगाली मालिका आहे, जी एका स्त्रीभोवती केंद्रित आहे. जिला तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अनेक अडथळे येतात. या मालिकेत सोलंकी रॉय, नील भट्टाचार्य आणि शौमो बॅनर्जी प्रमुख भूमिकेत आहेत.


रोबोट ड्रिम्स : थिएटर्स :सारा वॅरॉन यांच्या कादंबरीवर आधारीत रोबोट ड्रीम्स, कुत्रा आणि रोबोट यांच्यातील मैत्रीभोवती फिरणारी हृदयस्पर्शी कथा आहे. जी प्रेक्षकांना ८० आणि ९० च्या दशकात परत घऊन जातो.


बॅड कॉप : डिस्नी+ हॉटस्टार: बॅड कॉप नावाच्या या नवीन ॲक्शन थ्रिलर मालिकेत अनुराग कश्यप, गुलशन देवैया आणि हरलीन सेठी प्रमुख भूमिकेत आहेत. ही मालिका एका पोलिसाची कथा सांगते, जो त्याच्या वैयक्तिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असताना एका गुंडाला पकडण्याच्या मोहिमेवर निघतो.


इश्क विश्क रिबाउंड : थिएटर्स: रोहित सराफ, पश्मिना रोशन, नाइला ग्रेवाल आणि जिब्रान खान अभिनित आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित हा एक मनोरंजक रोमँटिक चित्रपट आहे. हा चित्रपट चार तरुण व्यक्तींच्या जीवनावर आधारीत आहे.


ट्रिगर वॉर्निंग : नेटफ्लिक्स : ओटीटी रिलिजच्या यादीमध्ये ट्रिगर वॉर्निंग नावाच्या तीव्र भरपूर अॅक्शन थ्रिलरचा समावेश आहे. जेसिका अल्बा अभिनीत चित्रपटाची​ कथा एका स्पेशल फोर्स कमांडोभोवती केंद्रित आहे. जी तिच्या वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर तिच्या गावी परतते. तिचा सामना एका धोकादायक टोळीशी होतो. जी तिला तिच्या वडिलांच्या मृत्यूबाबत चौकशी करण्यास आणि उत्तरे शोधण्यास भाग पाडते. मौली सूर्या दिग्दर्शित या चित्रपटात जेसिका अल्बा मुख्य भूमिकेत आहे.


द एक्सॉसिझम : थिएटर्स :जोशुआ जॉन मिलरचा बहुप्रतिक्षित चित्रपट, द एक्सॉर्सिझम आज सिनेमागृहात दाखल होत आहे. हॉररप्रेमींसाठी एक पर्वणी आहे. हा चित्रपट एका त्रासलेल्या अभिनेत्याभोवती फिरतो. ज्याला एका हॉरर चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान वेगवेगळे अनुभव येतात. जे त्याच्या मुलीला हस्तक्षेप करण्यास आणि त्या मागिल रहस्य शोधण्यास भाग पाडते. चित्रपटातील कलाकारांमध्ये रसेल क्रो, सॅम वर्थिंग्टन, रायन सिम्पकिन्स आणि क्लो बेली यांचा समावेश आहे.