बनावट मुखत्यारपत्राद्वारे खर्‍या घरमालकाला कागदोपत्री वगळले

मडगाव पोलिसांकडून तिघांवर गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी| गोवन वार्ता |
16th June, 12:49 am
बनावट मुखत्यारपत्राद्वारे खर्‍या घरमालकाला कागदोपत्री वगळले

मडगाव : बनावट मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अॅटर्नी) तयार करुन बोरकर कुटुंबीयांची फसवणूक केल्याचे प्रकरण घडले आहे. आगळी येथील अंजली बोरकर यांनी याप्रकरणी मडगाव पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तीन संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. 

आगळी येथील आनंद बोरकर यांनी हर्मिस लोबो व थेरेझा लोबो (दोन्ही रा. खारेबांध) यांच्या सहकार्याने फसवणूक करण्याच्या उद्देशाने आनंद यांचे काका कांता बोरकर यांच्या नावावरील खारेबांध प्रभाग १६ मधील घरासंदर्भात बनावट मुखत्यारपत्र तयार केले. तयार केलेले बनावट मुखत्यारपत्र खरे असल्याचे दाखवून त्यांनी ते मडगाव सबरजिस्ट्रारकडे सादर केले गेले. या कागदपत्रांच्या आधारे मडगाव पालिकेच्या दस्तऐवजातून घराच्या मालकीतून कांता बोरकर यांचे नाव वगळण्यात आले. घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर बोरकर कुटुंबीयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंजली बोरकर यांनी मडगांव पोलिसांत तक्रार दाखल केली असून याप्रकरणी मडगाव पोलिस पुढील तपास करत आहेत.