हिजबुल्लाहकडून इस्रायली लष्करी तळांवर जोरदार हल्ले

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
14th June, 11:43 am
हिजबुल्लाहकडून इस्रायली लष्करी तळांवर जोरदार हल्ले

जेरूसलेम : आता इस्रायल-हमास युद्धाच्या दरम्यान आता हिजबुल्लाहने इस्रायलची झाेप उवडवली आहे. त्यांनी अनेक इस्रायली लष्करी तळांवर वेगाने हल्ले केले. त्यामुळे मध्यपूर्वेत आता मोठे युद्ध होण्याची भीती आहे. हिजबुल्लाने अनेक इस्रायली लष्करी तळांवर ड्रोन आणि रॉकेट हल्ले केले आहेत. हिजबुल्ला ही इराणशी संबंधित लष्करी संघटना आहे.

याआधीही हिजबुल्लाहने बुधवारी इस्रायलवर २०० रॉकेट डागले होते. इराण समर्थित संघटना हिजबुल्लाहने गुरुवारी इस्रायलवर १५० हून अधिक मोठ्या आकाराच्या रॉकेट आणि ३० ड्रोनने हल्ला केला. असा दावा केला जातो की त्याच्या रॉकेट आणि ड्रोनने इस्रायली सैन्याच्या ९ स्थानांना लक्ष्य केले आहे, ज्यामुळे इस्रायलचे मोठे नुकसान झाले आहे. हिजबुल्लाहने बुधवारीही इस्रायलवर २५० रॉकेटने हल्ला केला.

टॉप कमांडर मारला गेला

हिजबुल्लाहचा टॉप कमांडर अबू तालेब मंगळवारी इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात ठार झाला, त्याला प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्लाहने हा हल्ला केला आहे. बदला म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे हिजबुल्लाहने म्हटले आहे. गोलान हाइट्ससह १५ इस्रायली स्थानांना लक्ष्य करण्यासाठी हिजबुल्लाहने १५० रॉकेट आणि ३० स्फोटक ड्रोनचा वापर केल्याचे अल जझीराने वृत्त दिले आहे. या हल्ल्यात किमान दोन जण जखमी झाल्याचे इस्रायली माध्यमांनी सांगितले.

हेही वाचा