झारखंड सरकारतर्फे ख्रिस्ती बांधवांसाठी ‘गोवा तीर्थयात्रा’

जूनच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येईल तीर्थयात्रेचे आयोजन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11th June 2024, 04:49 pm
झारखंड सरकारतर्फे ख्रिस्ती बांधवांसाठी ‘गोवा तीर्थयात्रा’

मडगाव : झारखंडमधील ख्रिश्चन बांधवांसाठी तेथील सरकारने गोवा तीर्थयात्रा आयोजित केली आहे. या योजनेअंतर्गत जूनच्या शेवटच्या आठवड्यात झारखंडमधील पूर्व सिंगभूम भागातील ७० ख्रिश्चन भाविक गोवा तीर्थाटनासाठी येणार आहेत. ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’अंतर्गत झारखंड पर्यटन विकास महामंडळ लिमिटेडने या तीर्थयात्रेचे आयोजन केले आहे.

या तीर्थयात्रेत सहभागी व्हायचे असल्यास त्यासाठी काही अटीही घालण्यात आल्या आहेत. यात्रेत सहभागी होण्यासाठी संबंधित भाविकाचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे. तसेच तो झारखंडचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे. यात्रेकरू हा बीपीएल श्रेणीअंतर्गत असला पाहिजे आणि अर्जदाराने यापूर्वी या सुविधेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदारांनी २० जूनपर्यंत पूर्व सिंगभूम, जमशेदपूर येथे जिल्हा क्रीडा कार्यालयात आपला अर्ज द्यावा, असे आवाहने तेथील महामंडळाने केले आहे.