बसला धडक दिल्याने चालकाचे सुटले क्रेनवरील नियंत्रण; चाकाखाली आल्याने एकजण ठार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11th June, 11:50 am
बसला धडक दिल्याने चालकाचे सुटले क्रेनवरील नियंत्रण; चाकाखाली आल्याने एकजण ठार

फोंडा : फोंडा येथील कदंब बस स्थानकावर मंगळवारी सकाळी अंडरपास जवळ काम करीत असलेल्या  क्रेनखाली चिरडल्याने प्रकाश चोडणकर (मोटरसायकल पायलट) या दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत झालेला प्रकाश चोडणकर  हा गेल्या कित्येक वर्षांपासून बस स्थानाकावर पायलट म्हणून काम करीत होते. 

समोर आलेल्या माहितीनुसार; अंडरपासचे काम करण्यासाठी फर्मागुडी येथून क्रेन बस स्थानकजवळ आली. त्यावेळी क्रेनची धडक एका प्रवाशी बसला बसल्याने क्रेन दुचाकी पार्क केलेल्या दिशेने गेली. त्यावेळी प्रवाशांच्या प्रतीक्षेत असलेले दुचाकी चालक प्रकाश चोडणकर क्रेन खाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान फोंडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताचा पंचनामा केला असून क्रेन चालक राजीव कुमार याला  चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

हेही वाचा