केंद्राकडून राज्याला ५३९.४२ कोटींचा निधी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
11th June 2024, 12:29 am
केंद्राकडून राज्याला ५३९.४२ कोटींचा निधी

पणजी : केंद्र सरकारने सर्व राज्यांना जूनमध्ये शुल्काचा वेगळा हिस्सा जारी केला आहे. त्यातून गोव्याला ५३९.४२ कोटींचा निधी मिळाला आहे.

सर्व राज्यांना मिळून १,३९,७५० कोटींचा वेगळा निधी (शुल्काचा हिस्सा) केंद्राने दिला आहे. प्रत्येक महिन्याला केंद्र सरकार राज्यांना शुल्कातील निधी देते. या निधीबरोबर जून महिन्यात सर्व राज्यांना आणखी एक हप्ता मिळाला. यामुळे राज्याला ५३९.४२ कोटी रुपये मिळाले आहेत. केंद्र सरकाराने सर्व राज्यांना जूनपर्यंत २,७९,५०० कोटींचा निधी जारी केला आहे.

सर्वाधिक २५,०६९.८८ कोटींचा निधी उत्तर प्रदेशला, त्याखालोखाल मध्य प्रदेशला १०,९७०.४४, तर पश्चिम बंगालला १०,५१३.४६ कोटींचा ​निधी मिळाला. महाराष्ट्राच्या वाट्याला ८,८२८.०८ कोटी रुपये आले.