दोन दिवसांपूर्वीच मित्राने घेतली होती सेकंडहँड दुचाकी; पण ठरली मृत्यूस कारण... फोंड्यात एक ठार

फोंड्यातील अपघात प्रकरण

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th May, 04:19 pm
दोन दिवसांपूर्वीच मित्राने घेतली होती सेकंडहँड दुचाकी; पण ठरली मृत्यूस कारण... फोंड्यात एक ठार

फोंडा : कुर्टी येथील उड्डाण पुलावर सुसाट वेगाने धावणाऱ्या केटीएम या दुचाकीची धडक दुभाजकाला बसून झालेल्या अपघातात श्रावण हरी नाईक (१९, रा. कुंडई) या युवक जागीच ठार झाला. दोन दिवसांपूर्वी मित्राने खरेदी केलेली जुनी केटीएम घेऊन श्रावण नाईक या युवक उसगाव येथून माघारी कुंडई येथे जात होता. फोंडा पोलीसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.

गोव्यातील अपघातांच्या मालिका सातत्याने सुरूच आहेत. फोंडा तालुक्यात आज दुपारपर्यंत दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिला अपघात फोंडा उड्डाण पुलावर झाला. याठिकाणी दुचाकीची वीज खांबाला धड बसल्यामुळे श्रावण हरी नाईक (१९) हा दुचाकीचालक जागीच ठार झाला. दुसरा अपगात पंचवाडी-शिरोडा येथे घडला. या ठिकाणी टँकर व कार यांच्यात टक्कर होऊन मुहंमद नामक व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य तिघेजण जखमी आहे. 

हेही वाचा

पंचवाडी शिरोडा येथे टँकर व कार यांच्यात अपघात; एकजण ठार तर तिघे जखमी

पहिल्या अपघाताविषयी मिळालेल्या माहितीनुसार, जीए-०७एम-३२९९ क्रमांकाची केटीएम ही जुनी दुचाकी श्रावण याच्या मित्राने दोन दिवसांपूर्वी खरेदी केली होती. दुचाकी चालवण्याचे आकर्षण असलेल्या श्रावण नाईक याने शुक्रवारी सकाळी मित्राकडून जबरदस्तीने केटीएम दुचाकी घेतली. त्यावेळी मित्राने त्याला कार घेऊन जाण्याची विनंती केली होती. पण, मित्राची विनंती डावलून केटीएम घेऊन उसगाव येथे गेले होता. सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास सुसाट वेगाने उड्डाण पुलावरून जात असताना नियंत्रण गेल्याने केटीएमची धडक दुभाजकाला बसली. त्यानंतर श्रावणचे डोके वीज खांबावर आपटले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. अपघाताची माहिती मिळाल्यावर मृत झालेल्या श्रावण नाईक याच्या कुटुंबीय, तसेच मित्रांनी उपजिल्हा इस्पितळात गर्दी केली होती. श्रावण नाईक याने हेल्मेट परिधान केले नव्हते. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्टी येथील उड्डाण पुलावर युवकांची दुचाक्या घेऊन रात्रीच्या वेळी स्टंट केले जात आहे. अनेक युवक नंबर नसलेल्या आकर्षक दुचाक्या घेऊन उडाण पुलावर स्टंट करीत असतात. यापूर्वी स्टंट करताना अपघात घडले आहेत.