चाहत्यांना तालावर नाचवणार ‘श्रीवल्ली’

पुष्पा-२चे दुसरे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
23rd May, 07:12 pm
चाहत्यांना तालावर नाचवणार ‘श्रीवल्ली’

‘पुष्पा’ तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्याच्या गाण्यांपासून ते पुष्पराज स्टाईलपर्यंत लोकांना त्याचे वेड लागले होते. तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. ‘पुष्पा २’ आता या वर्षी १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे पहिले गाणे आले, जे प्रेक्षकांना खूप आवडले. पुष्पराजच्या नृत्याने पुन्हा खळबळ उडाली. आता प्रेक्षक वाट पाहतोय श्रीवल्लीची. या चित्रपटाचे दुसरे गाणे २९ मे रोजी प्रदर्शित होणार असून, ते गेल्या वेळच्या सामी सामीसारखेच असेल.

‘पुष्पा २’ मैत्री मूव्ही मेकर्स बनवत आहे. त्यांनी ‘एक्स’वर चित्रपटाच्या दुसऱ्या गाण्याचा अनाउंसमेंट टीझर शेअर केला आहे. यामध्ये रश्मिका दिसत आहे. हे पाहता दुसरे गाणे देखील सामी सामी सारखे असणार आहे असा अंदाज बांधता येतो.

या व्हिडिओमध्ये रश्मिका दिसत आहे. यामध्ये ती सुरुवातीला मेकअप करताना दाखवली जात आहे. तिला विचारले जाते की “ओ श्रीवल्ली भाभी. पुष्पा २ चे दुसरे सिंगल रिलीज होत आहे, मला सांग कोणते गाणे आहे’ यानंतर रश्मिका येते आणि गाण्याच्या काही ओळी सुरू करते. गाण्याची ओळ आहे ‘अंगारों का सा अंबर लगता है सामी’ यावर रश्मिकाही एक पाऊल टाकते. ‘पुष्पा २’ चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला ६ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिकासोबतच फहद फासिल आणि प्रकाश राज देखील यात दिसणार आहेत.

हिंदीसह ५ भाषांमध्ये गाणे

टीझर शेअर करताना हे गाणे वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये रश्मिकाला ६ भाषांमध्ये गाणी गाताना दाखवण्यात आले आहे. मैत्री मूव्ही मेकर्सने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'पुष्पा २'चे दुसरे गाणे २९ मे रोजी प्रदर्शित होईल. यासोबतच त्याचे नाव तेलगूमध्ये सुसेकी, हिंदीमध्ये अंगारो, तमिळमध्ये सुदाना, कन्नडमध्ये नोडोका, मल्याळममध्ये कंदालो, बंगालीमध्ये अगुनार असे असेल असेही सांगण्यात आले आहे.