आ​ज झळकणार मिस्टर अँड मिसेस माहीसह छोटा भीम

पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी पंचायत ३ सज्ज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th May, 11:34 pm
आ​ज झळकणार मिस्टर अँड मिसेस माहीसह छोटा भीम

या शुक्रवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर व चित्रपटगृहांमध्ये अनेक रोमांचक नवीन चित्रपटांचे आगमन होत आहे. या आठवड्यात नेटफ्लिक्स, डिस्ने+ हॉटस्टार, जिओसिनेमा तसेच चित्रपटगृहांमध्ये दहा नवीन चित्रपट आणि वेबसिरीज झळकणार आहेत. मिस्टर अँड मिसेस माही, छोटा भीमसह पंचायत ३ आपल्या मनोरंनासाठी आजपासून झळकणार आहेत.


'अ पार्ट ऑफ यू' (नेटफ्लिक्स)

नेटफिल्क्सची नवी वेबसिरीज एग्नेस या किशोरवयीन मुलीच्या आयुष्यावर आधारीत आहे. जिचे आयुष्य एका धक्कादायक घटनेनंंतर बदलते. एग्नेस पौगंडावस्थेतील गोंधळलेल्या अवस्थेत तिची स्वप्ने पूर्ण करण्याच्या प्रयत्नात स्वतःचा शोध घेते. तथापि, जेव्हा तिला तिच्या निर्णयांच्या परिणामांना सामोरे जावे लागते तेव्हा जीवन तिला मौल्यवान धडे शिकवते. या मालिकेत फेलिसिया मॅक्सिम, एडविन रायडिंग आणि झारा लार्सन प्रमुख भूमिकेत आहेत.


देढ बिघा जमीन (जीओ सिनेमा)
हा एक हटके चित्रपट आहे, ज्यात प्रतीक गांधी आणि खुशाली कुमार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट एका व्यक्तीची कथा सांगतो, जो भ्रष्ट व्यवस्थेचा पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतो. एक अधिकारी त्याची जमीन घेण्याच्या नावाखाली फसवणूक करतो. त्यामुळे त्याला भ्रष्ट व्यवस्थेला सामारे जावे लागते.


छोटा भीम अँड क्रूझ ऑफ दम्यान (थिएटर्स)
हा थोट्या प्रेक्षकांंसाठी ॲक्शन-ॲनिमेटेड चित्रपट आहे. जो भीम आणि त्याच्या मित्रांभोवती केंद्रित आहे. जे सोनापूरला दुष्ट दम्यानपासून वाचवण्यासाठी लढा देतात. या चित्रपटात अनुपम खेर, मकरंद देशपांडे आणि मुकेश छाबरा या कलाकारांचा समावेश आहे. सर्वांच्या लाडक्या छोट्या भीमच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट नक्कीच एक मेजवानी आहे.



जिम हेन्सन आयडिया मॅन (डिस्ने + हॉटस्टार)
'जिम हेन्सन आयडिया मॅन' ही मपेट मॅन म्हणून ओळखले जाणारे कलाकार जिम हेन्सन यांच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक सिरीज आहे. डॉक्युमेंट्री बायोपिकमध्ये हेन्सनच्या सुरुवातीच्या काळातील संघर्ष, प्रसिद्धी आणि वैयक्तिक जीवनाचे ​चित्रीकरण आहे.


'रेझिंग व्हॉइसेस' (नेटफ्लिक्स)
'रेझिंग व्हॉइसेस' ही एक आकर्षक मालिका आहे जी १७ वर्षांच्या मुलीभोवती फिरते. जी तिच्या हायस्कूलमध्ये लैंगिक अत्याचाराची तक्रार करते. तपास तिच्या वैयक्तिक जीवनात सुधारणा करतो आणि तिच्या सभोवतालच्या प्रत्येकाशी असलेल्या तिच्या नातेसंबंधांची चाचणी घेतो. मिगेल सेझ कॅरल यांच्या कादंबरीवर आधारित या मालिकेत निकोल वॉलेस, क्लारा गॅले आणि आयचा व्हिलाव्हर्डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


मिस्टर आणि मिसेस माही (थिएटर्स)
'मिस्टर आणि मिसेस माही हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांचा समावेश असलेला हा चित्रपट एका जोडप्याचा प्रवास त्यांच्या नात्यातील गुंतागुंत आणि महत्त्वाकांक्षा यांचा शोध घेतो.


व्हिजिल सीझन २ - (नेटफ्लिक्स)
'व्हिजिल सीझन २' ही डीसीआय एमी सिल्वाच्या कहाणीचा दुसरा भाग आहे, जी ब्रिटिश शस्त्रास्त्रांशी संबंधित प्रकरणाचा तपास करत असताना स्वतः गंभीर परिस्थितीत सापडते. पहिला सिझन जिथून संपला होता तिथून नवीन सीझन सुरू होतो.


हाऊ टू रिन लव्ह (नेटफ्लिक्स)
शिवनाथी माबुया, बोहंग मोइको आणि डुमिसानी म्बेबे अभिनीत, 'हाऊ टू रिन लव्ह' ही एक विनोदी चित्रपट आहे, जो झोलेका नावाच्या स्त्रीचे कथानक दर्शवितो. चित्रपट विश्वास आणि नातेसंबंधांच्या विषयांवर विनोदाने स्पर्श करतो.


'सावी: अ ब्लडी हाऊसवाइफ (थिएटर्स)
'सावी: अ ब्लडी हाऊसवाइफ'मध्ये अनिल कपूर, दिव्या खोसला आणि हर्षवर्धन राणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही कथा सावी या साध्या गृहिणीभोवती फिरते जी आपल्या पतीला इंग्लंडमधील उच्च सुरक्षा तुरुंगातून पळून जाण्यासाठी एक धोकादायक योजना आखते.


पंचायत सीझन ३ (अॅमेझॉन प्राईम)
'पंचायत सीझन ३' पुन्हा एकदा अधिक हसण्यासोबतच आणि जीवनाचे धडे घेऊन परतला आहे. द व्हायरल फिव्हरने तयार केलेल्या, या मालिकेत जितेंद्र कुमार, रघुबीर यादव आणि नीना गुप्ता आहेत. ही मालिका एका अभियांत्रिकी पदवीधराच्या जीवनावर आधारीत आहे, जो उत्तर प्रदेशातील एका काल्पनिक गावात पंचायत सचिव बनतो. चाहत्यांना पुन्हा एकदा त्याच हृदयस्पर्शी आणि विनोदी कथाकथनाची अपेक्षा आहे, ज्याने मागील दोन्ही सीझन हिट केले आहेत.


द फर्स्ट ओमेन (डिस्ने+ हॉटस्टार)
'द फर्स्ट ओमेन' हा अर्काशा स्टीव्हनसन दिग्दर्शित २०२४ चा अमेरिकन अलौकिक भयपट आहे. १९७६ च्या द ओमेन चित्रपटाचा प्रीक्वल आहे, यात नेल टायगर फ्री, तौफीक बारहोम, सोनिया ब्रागा, राल्फ इनेसन आणि बिल निघी यांच्या भूमिका आहेत. रोममधील चर्चमध्ये काम करणाऱ्या एका अमेरिकन स्त्रीवर कथानक केंद्रित आहे.


एरिक (नेटफ्लिक्स)
'एरिक' १९८० च्या न्यूयॉर्कमधील कठपुतळी कलाकाराची कहाणी आहे, ज्याचा नऊ वर्षांचा मुलगा एडगर गायब झाला आहे. ज्याचा शोधाशोध घेत असताना तो व्यसनाच्या आहारी जातो. तो त्याचे मित्र आणि कुटुंबापासून दूर होत जातो.