झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू व्हिटलवर बिबट्याचा हल्ला; पाळीव कुत्र्यामुळे वाचला!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
25th April, 02:24 pm
झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू व्हिटलवर बिबट्याचा हल्ला; पाळीव कुत्र्यामुळे वाचला!

नवी दिल्ली : झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू गाय व्हिटल (Guy Whittal) याच्यावर हुमानी परिसरात बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे. Guy Whittal या क्षेत्रात ट्रेकिंगसाठी गेले होते. तिथेच बिबट्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. पाळीव कुत्र्यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र, यात तो जखमी झाला.

Guy Whittal चा पाळीव कुत्रा चिकारा याने बिबट्याशी झुंज देत ५१ वर्षीय क्रिकेटपटूचे प्राण वाचवले. Guy Whittal याची पत्नी हन्ना हिने या वृत्ताला दुजोरा दिला. Guy Whittal च्या शरीरावर बँडेज केल्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जखमी झाल्यानंतर Guy Whittalला एअरलिफ्ट करून हरारे येथे नेण्यात आले. तिथे त्याच्या जखमांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ‘Guy Whittal खरोखर भाग्यवान आहे. आधी मगर आणि आता बिबट्या, तो खरोखरच ९ जीव असलेली मांजर आहे.  भाग्यवान होत्या की त्यांच्या मदतीसाठी चिकार (पाळीव कुत्रा) तिथे होती. त्याने बिबट्याला पळवून लावले. अन्यथा Guy वाचले नसते’, असे हन्ना हिने म्हटले आहे.

पाळीव कुत्र्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही वर्षांपूर्वी Guy मगरीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला होता. ही मगर त्यांच्या घरात पलंगाखाली झोपली होती. आम्ही चिकाराचे खूप आभारी आहोत. चिकाराला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो लवकरच बरा होईल, असे हन्नाने म्हटले आहे.

हेही वाचा