उत्तराखंडात अग्नितांडव सुरूच; पुन्हा ६४ ठिकाणी पेटवली जंगले!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th May, 03:23 pm
उत्तराखंडात अग्नितांडव सुरूच; पुन्हा ६४ ठिकाणी पेटवली जंगले!

डेहरादून : उत्तराखंडमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात जंगलांना आगी लावण्याचे सत्र सुरू असून गेल्या २४ तासांत नवीन ६४ ठिकाणी आगीचे डोंब उसळले आहेत. यात मूळ नेपाळमधील दोन कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती तेथील वनखात्याने आज सकाळी जारी केली आहे. या घटनांची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दुपारी उच्चस्तरीय बैठक घेऊन कडक कारवाईचा आदेश जारी केला आहे.

हेही वाचा

उत्तराखंडात पुन्हा जंगलांत वणवा; नव्या ४० ठिकाणी आगीचा भडका!

उत्तराखंडात २४ तासांत ४६ ठिकाणी जंगलांना आग; ५३.१५ हेक्टर जंगल जळून खाक

उत्तरांडात गेल्या २४ तासांत जंगलांना आगी लावण्याच्या ६४ नवीन घटनांची नोंद झाली आहे. त्याचवेळी सोमेश्वरमधील सनराकोटच्या जंगलात लागलेल्या आगीत दोन नेपाळी कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे. गुरुवारी जंगलात लागलेल्या आगीत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दुसऱ्या कामगाराचा गुरुवारी रात्री उशिरा बेस हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला तर कामगार महिलेचा हल्दवानी येथील सुशीला तिवारी हॉस्पिटलमध्ये (एसटीएच) मृत्यू झाला. आणखी एका महिला कामगारावर हल्दवणी येथे उपचार सुरू आहेत. या घटनांनतर आज मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जंगलातील आग रोखण्यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली आहे.

नव्याने लागल्या आगीच्या ६४ घटनांपैकी ३० गढवाल, २९ कुमाऊं आणि पाच वन्यजीव क्षेत्रातील आहेत. २४ तासांत ७४.६७ हेक्टर जंगलातील वनसंपत्ती जळून खाक झाली आहे.

हेही वाचा