प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकरण : राहुल गांधींचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांस पत्र

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th May, 03:40 pm
प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकरण : राहुल गांधींचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांस पत्र

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून जनता दल सेक्युलर (जेडी-एस) नेते प्रज्वल रेवण्णा यांच्याकडून छळवणूक झालेल्या पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याची विनंती केली आहे.  गांधींनी सिद्धरामय्या यांना लिहलेल्या पत्रात  रेवण्णा यांच्या कृतीचा निषेध केला आणि त्यांच्यावर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात असल्याचा आरोप केला. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत त्यांनी म्हटले की, महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांवर मौन बाळगणारा असा लोकप्रतिनिधी मी अजून पाहिला नाही. गांधींनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'मी तुम्हाला (सिद्धरामय्या) विनंती करतो की कृपया पीडितांना शक्य ती सर्व मदत करा.' PM Campaigned For Mass Rapist': Rahul Gandhi's Big Charge In Letter To  Karnataka CM | Times Now

राहुल गांधींनी पुढे लिहिले की, 'डिसेंबर २०२३ मध्ये जी देवराज गौडा यांनी प्रज्वल रेवन्ना यांच्या कृतींबद्दल, विशेषत: प्रज्वल यांच्या इतिहासाबद्दल आणि लैंगिक हिंसाचाराच्या व्हिडीओंबद्दल गृहमंत्री अमित शहा यांना माहिती दिली होती, हे जाणून मला खूप धक्का बसला आहे.' धक्कादायक बाब म्हणजे केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना या गंभीर आरोपांची माहिती होती, परंतु तरीही पंतप्रधानांनी बलात्कारी व्यक्तीसाठी प्रचार केला. गांधी म्हणाले, 'याशिवाय, तपासाला हानी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने जाणूनबुजून रेवण्णा यांना भारतातून पळून जाण्याची परवानगी दिली. या गुन्ह्यांचे स्वरूप आणि पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या नेतृत्वाखाली जेडी(एस) नेत्याला मिळालेले फायदे लक्षात घेता, याचा तीव्र निषेध केला पाहिजे.Prajwal Revanna scandal: Not just Lok Sabha elections, the impact could go  beyond - The Economic Times

त्यांनी आरोप केला, 'माझ्या दोन दशकांच्या सार्वजनिक सेवेच्या इतिहासात महिलांवरील हिंसाचारावर सतत मौन बाळगणारा ज्येष्ठ लोकप्रतिनिधी मी पाहिला नाही. हरियाणातील आमच्या कुस्तीपटूंपासून ते मणिपूरच्या आमच्या बहिणींपर्यंत सर्व भारतीय महिलांना अशा गुन्हेगारांना पंतप्रधानांच्या छुप्या पाठिंब्याचा फटका सहन करावा लागत आहे. माता-भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणे हे काँग्रेसचे नैतिक कर्तव्य असल्याचे गांधी म्हणाले. 


हेही वाचा