सुचरिता मोहंती यांचा संबित पात्रांविरोधात निवडणूक लढण्यास नकार; दिले 'हे' कारण

आधी सूरत आणि इंदूर, मग आता पुरीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी येथून निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. संबित पात्रा पुरीतून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th May, 02:58 pm
सुचरिता मोहंती यांचा संबित पात्रांविरोधात निवडणूक लढण्यास नकार; दिले 'हे' कारण

पुरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन टप्प्यातील मतदान संपले आहे. तिसऱ्या टप्प्यात १२  राज्यांतील ९४  जागांवर मतदान होणार आहे. दरम्यान, सुरत आणि इंदूरनंतर काँग्रेसला पुन्हा एकदा झटका बसला आहे. काँग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी ओडिशाच्या पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडून कोणतीही आर्थिक मदत केली जात नसल्याचा आरोप मोहंती यांनी केला आहे. पक्षाने दिलेल्या निधीशिवाय प्रचार करणे मला शक्य नाही, त्यामुळेच मी निवडणूक लढविण्यास नकार देत असल्याचे त्या म्हणाल्या. पुरी येथून भाजपने संबित पात्रा यांना तिकीट दिली आहे. 

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना लिहिलेल्या पत्रात सुचरिता मोहंती यांनी म्हटले आहे की, पुरी लोकसभा मतदारसंघातील आमच्या निवडणूक प्रचारावर वाईट परिणाम झाला आहे. पक्षाने कोणतेही आर्थि सहाय्य न  दिल्यामुळेच हा प्रसंग ओढवल्याचे मोहंती म्हणाल्या. तसेच याबाबत ओडिशा काँग्रेसचे प्रभारी डॉ.अजोय कुमार यांना सांगितल्यावर त्यांनी तुम्हीच तुमची व्यवस्था करा, असा सल्ला दिल्याचे म्हटले. No funding from Congress, Puri Lok Sabha nominee returns ticket |  Bhubaneswar News - Times of India

याआधी सुरत आणि इंदूरमध्येही अशा घटना घडल्या आहेत. यापूर्वी इंदूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी येथील लोकसभेचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला


हेही वाचा