आचारसंहितेचा भंग : भाजप, काँग्रेसला नोटीस; २९ एप्रिलपर्यंत मागितले उत्तर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
25th April, 02:21 pm
आचारसंहितेचा भंग : भाजप, काँग्रेसला नोटीस; २९ एप्रिलपर्यंत मागितले उत्तर

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मोठी कारवाई केली असून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना नोटीस बजावली आहे. आचारसंहितेच्या कथित उल्लंघनाची दखल घेत आयोगाने ही नोटीस जारी केली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट निर्माण केल्याचा आरोप केला होता. याला अनुसरून ही नोटीस बजावण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ७७ अंतर्गत नोटीस

निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्याच्या ‘कलम ७७’ चा वापर करून ही नोटीस जारी केली आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आयोगाकडे तक्रार केली होती. दोन्ही तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने ही नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही नेत्यांकडून २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तरे मागवली आहेत.

राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांच्या, विशेषतः स्टार प्रचारकांच्या वर्तनाची जबाबदारी घ्यावी लागेल. उच्च पदावरील लोकांच्या प्रचार भाषणांचे अधिक गंभीर परिणाम होतात, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा