बंगळुरूतील सॉफ्टवेअर कंपनीचा मालक दूधसागर धबधब्यावरून बेपत्ता... पत्नीची तक्रार

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
19th April, 05:20 pm
बंगळुरूतील सॉफ्टवेअर कंपनीचा मालक दूधसागर धबधब्यावरून बेपत्ता... पत्नीची तक्रार

फोंडा : कुळे येथील दूधसागर धबधब्यावर गेलेल्या बंगळुरू येथील पर्यटक अब्दुल रफिक (६२) हा गुरुवारी दुपारीपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी कुळे पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुळे पोलीस व वन खात्याचे कर्मचारी गुरुवारी पासून बेपत्ता झालेल्या पर्यटकाचा शोध घेत आहेत.

बंगळुरू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीची मालक आपल्या पत्नीसह गोव्यात आला होता. गुरुवारी दुपारी कुळे येथून दूधसागर धबधब्यावर हे दोघे पार्किंग स्थळावर उतरले. त्यावेळी त्याच्या पत्नीने शौचालयात जाण्यापूर्वी पर्स व अन्य साहित्य पतीकडे दिले होते. परंतु शौचालयातून परतल्यानंतर पत्नीला पती आढळून आला नाही. पत्नीने दूधसागर धबधाब्यावर जाऊन पाहिले. पण, पती सापडला नाही. त्यानंतर कुळे पोलीस स्थानकात तिने पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

गुरुवारी रात्री उशिरा पर्यंत पोलिसांनी जंगलात बेपत्ता पर्यटकाचा शोध घेतला. शुक्रवारी पुन्हा शोध कार्यास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी वन खात्याचे कर्मचारी सुद्धा शोध कार्यास सहभागी झाले होते. कुळे पोलीस व वन खात्याचे कर्मचारी बेपत्ता पर्यटकाचा शोध घेत आहेत. 

हेही वाचा