अंदाज हवामानाचा : मुरगावात ३४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
02nd May, 04:05 pm
अंदाज हवामानाचा : मुरगावात ३४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

पणजी : गोव्यात पुढील सात दिवस तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तर आज आणि उद्या वातावरण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. मुरगाव येथे बुधवारी कमाल ३४.६ अंश तर पणजीत कमाल ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  मंगळवारी राज्यातील विविध भागात ३३ ते ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

राज्यात ३ ते ८ मे दरम्यान वातावरण कोरडे राहणार असून पावसाची शक्यता नाही. पुढील तीन दिवस कमाल तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नाही. याशिवाय खात्याने २ ते ८ मे दरम्यान सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर पुढील सात दिवसात हिट इंडेक्स म्हणजे जाणवणारे तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा कमी राहण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली आहे.

गेल्या चोवीस तासांत पणजीत किमान तापमानात १.६ अंशाने कमी होऊन २४.७ अंश सेल्सिअस झाले होते. तर मुरगाव येथे किमान २५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हेही वाचा