या आठवड्यात ओटीटीवर ‘शैतान’सह झळकणार दोन नवीन वेबसिरीज

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
03rd May, 12:07 am
या आठवड्यात ओटीटीवर ‘शैतान’सह झळकणार दोन नवीन वेबसिरीज

मे महिन्याची सुरुवात खूप चांगली होणार आहे. १ ते ५ मे पर्यंत ओटीटी वर चांगला कंटेंट उपलब्ध होणार आहे. दोन नवीन वेब सिरीज आणि एक ब्लॉकबस्टर चित्रपट रिलीज होणार आहेत.
शैतान : अजय देवगण आणि आर माधवन यांचा 'शैतान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १४९.४९ कोटी रुपये (नेट) आणि जगभरात २११.०६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. होय, हा भयपट ३ मे रोजी ओटीटीवर धडकणार आहे.


द ब्रोकन न्यूज-२ : 'द ब्रोकन न्यूज'चा सीझन २ या आठवड्यात ओटीटीवर झळकणार आहे. विनय वैकुळे दिग्दर्शित या वेबसिरीजमध्ये सोनाली बेंद्रे, श्रिया पिळगावकर आणि जयदीप अहलावत यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या तिघांनीही या वेब सीरिजमध्ये पत्रकारांची भूमिका साकारली आहे. 'द ब्रोकन न्यूज सीझन २' ३ मे रोजी झी ५ वर पडद्यावर येईल.



हिरामंडी: डायमंड बाजार : 'हिरामंडी' देखील नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरमंडी' हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, मनीषा कोईराला, शर्मीन सहगल आणि संजीदा शेख यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय फरीदा जलाल, ताहा शाह बदुष्शा, फरदीन खान, अध्यायन सुमन आणि शेखर सुमन हे देखील या वेब सिरीजमध्ये आहेत.



द ग्रेट इंडियन कपिल शो : या सर्वांशिवाय 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवा एपिसोडही ४ मे रोजी येणार आहे. यावेळी कपिलच्या शोमध्ये सनी देओल आणि बॉबी देओल मस्ती करताना दिसणार आहेत.



द आयडीया ऑफ यू :द आयडीया ऑफ यू' हा रोमँटिक, विनोदी चित्रपट आहे. २ मे रोजी प्राईम व्हिडीओवर प्रदर्शीत झाला.



वीमेन ऑफ माय बिलियन  : वीमेन ऑफ माय बिलियन' हा माहितीपट ३ मे रोजी प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. एका महिलेची गोष्ट या माहितीपटात दाखवण्यात आली आहे. कन्याकुमारी ते कश्मीरपर्यंतचा पायी प्रवास करत ही महिला आपला प्रवास पूर्ण करते.



मंजुम्मेल बॉईज : 'मंजूम्मेल बॉईज' हा मल्याळम चित्रपट या वर्षी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता ५ मे रोजी हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. मल्याळमसह तेलुगू, तामिळ, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे.