‘हिरामंडी’च्या ​स्क्रि​निंगला कलाकारांची मांदियाळी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
26th April, 12:25 am
‘हिरामंडी’च्या ​स्क्रि​निंगला कलाकारांची मांदियाळी

संजय लीला भन्साळी यांची बहुप्रतिक्षित वेब सिरीज 'हिरामंडी: द डायमंड बझार' १ मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. वेश्यांच्या जीवनावर आधारित या मालिकेकडून चाहते आणि सेलिब्रिटींना खूप अपेक्षा आहेत.
'हिरामंडी'ची गाणी, भव्य सेट आणि जबरदस्त कास्टिंग आधीच चर्चेत आहे. पण आता रिलीजपूर्वी या मालिकेचा पहिला रिव्ह्यूही समोर आला आहे.
बुधवारी रात्री संजय लीला भन्साळी यांनी मुंबईत 'हिरामंडी' चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते, ज्यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. रेखा, जेनेलिया डिसूजा, विकी कौशल, रकुल प्रीत सिंग, अनन्या पांडे, करण जोहर यांसारख्या सेलिब्रिटींनी स्क्रिनिंगला हजेरी लावली. सलमान खानही संजय लीला भन्साळींविरुद्धचा आपला जुना राग विसरून त्याला पाठिंबा देण्यासाठी खास गेटअपमध्ये स्क्रिनिंगला पोहोचला.
'हिरमंडी' पाहिल्यानंतर अनेक बॉलीवूड स्टार्सनी त्यांचे पहिले रिव्ह्यू चाहत्यांसोबत शेअर केले आहेत आणि संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेली ही मास्टरपीस मालिका किती भव्य आहे हे सांगितले आहे. सर्वप्रथम जेनेलिया डिसूझा हिने हिरामंडी मालिकेचा पहिला रिव्ह्यू शेअर केला. मालिका पाहिल्यानंतर अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपट निर्माता भन्साळीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
या मालिकेचा रिव्ह्यू देताना तिने लिहिले आहे की, हिरामंडीचे दोन भाग पाहिले, त्यानंतर मला ती आणखी पाहण्याची उत्सुकता लागली. संजय सर आम्हाला वेगळ्याच जगात घेऊन गेले. काय तो प्रवास, नेहमीप्रमाणे आम्हाला मंत्रमुग्ध केले. मला सगळ्या कलाकारांच्या भू​मिका खूप आवडल्या आणि संपूर्ण क्रूने किती छान काम केले आहे. नेटफ्लिक्स, हे खरोखर खास आहे, असे ती म्हणाली.
काजोलची बहीण आणि अभिनेत्री तनिषा मुखर्जीने 'हिरामंडी'चे मन मोकळेपणाने कौतुक केले आहे. तनिषाने सांगितले की, ही सिरीज नेटफ्लिक्सवर प्रत्येकाने नक्की पहावी. तनिषा जे बोलली त्यावरून ही मालिका तिला किती आवडली याचा अंदाज येतो.
हेमा मालिनी- धर्मेंद्र यांची मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओलनेही 'हिरामंडी'च्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. मालिका पाहिल्यानंतर तिनेही रिव्ह्यूही दिले आणि संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले.
ईशा देओलने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आणि लिहिले, बहुप्रतिक्षित हिरामंडीच्या भव्य प्रीमियरला उपस्थित राहिली. जे पाहिले ते ते खूपच नेत्रदीपक होते. त्या काळात आपण पोहोचलो होतो. फरदीन खान १४ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर हिरामंडी मालिकेतून पुनरागमन करत आहे. अशा परिस्थितीत ईशा देओलने तिच्या पोस्टमध्ये फरदीनचे इंडस्ट्रीत स्वागत केले आहे. मालिकेतील प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक व्यक्तिरेखा शानदार असल्याचेही ती म्हणाली.
'हिरमंडी'बद्दल बोलायचे झाले तर त्याचे भव्य सेट्स आणि गाणीही खूप चांगली आहेत. ही मालिका १९४० च्या दशकात ब्रिटीश राजवटीविरूद्ध भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान लाहोरमधील हीरामंडीतील वेश्यांच्या जीवनावर आधारित आहे. मालिकेची स्टारकास्टही चांगली आहे. यामध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, अध्यायन सुमन, शेखर सुमन, फरदीन खान, संजीदा शेख आपली जादू पसरवताना दिसणार आहेत.