इतिहास साक्षी आहे...सिंधु संस्कृतीचा उदय आणि अस्त

सिंधू संस्कृती हि इसवी सन पूर्व ३३०० ते इसवी सन पूर्व १९०० च्या काळात बहरली. त्यामधील इ.स.पूर्व २६०० ते इ स पूर्व १९०० हा काळ पूर्णपणे विकसित झालेल्या सिंधू संस्कृतीचा ओळखला जातो.वैदिक संस्कृतीचा काळ इसवी सन पूर्व १५०० ते इसवी सन पूर्व ६०० हा मानला जातो. वैदिक संस्कृतीची विभागणी ऋग्वेदिक आणि उत्तर ऋग्वेदिक असा केला जातो.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
05th May, 03:47 pm
इतिहास साक्षी आहे...सिंधु संस्कृतीचा उदय आणि अस्त

पणजी : सिंधू संस्कृतीचा प्रथम शोध १९२१ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे अधिकारी दयाराम सहानी यांनी लावला. त्यांनी पंजाबमधील रावी नदीच्या काठावर असलेल्या हडप्पा येथे उत्खनन केले आणि तेथे सिंधू संस्कृतीच्या अवशेषांचा शोध लावला. १९२२ मध्ये, इंडियन आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे अधिकारी राखालदास बॅनर्जी यांनी सिंधू संस्कृतीच्या दुसऱ्या मोठ्या शहराचा शोध लावला. हे शहर मोहें-जो-दडो नावाने ओळखले जाते आणि ते सिंधू नदीच्या काठावर आहे.

या दोन शोधांमुळे सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाची माहिती जगभरात पसरली. त्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी सिंधू संस्कृतीच्या अवशेषांचा शोध लागला. सिंधू संस्कृती हा जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. तिचा काळ सुमारे ३३०० ते १३०० ईसापूर्व असा अंदाज आहे. सिंधू संस्कृतीचे प्रमुख शहरे हडप्पा आणि मोहें-जो-दडो या आहेत. या शहरांमध्ये उत्खननातून अनेक महत्त्वपूर्ण अवशेषांचा शोध लागला आहे, ज्यात भव्यतापूर्ण इमारती, जलवाहतूक प्रणाली, आणि लिपी आणि कलाकृतींचा समावेश आहे. सिंधू संस्कृतीचे शोध हे भारतीय इतिहास आणि संस्कृतीसाठी एक महत्त्वाचे प्रगतीचे टप्पे आहेत.

इ. स. १९२१ मध्ये पंजाब राज्यातील रावी आणि सिंधू नदीच्या काठी हडप्पा या शहरात उत्खननामध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागल्या मुळे या संस्कृतीला ‘हडप्पा संस्कृती’ असे नाव मिळाले. हडप्पा संस्कृतीचे बहुतांश अवशेष सिंधू नदीच्या काठी (किनाऱ्यावर) आढळून आल्यामुळे याला ‘सिंधू संस्कृती’ म्हणून देखील ओळखले जाते.हडप्पा येथे झालेल्या उत्खननासोबतच हडप्पा शहराच्या दक्षिणेला काही अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो येथे झालेल्या उत्खननामध्ये देखील सारखेच अवशेष आढळून आले आहे.

हडप्पा संस्कृती ही मुख्यत: तत्कालीन भारतातील पंजाब, हरियाना, राजस्थान, गुजरात, जम्मू-काश्मीर इत्यादी प्रदेशात विस्तारित पणे आढळून आली आहे. हडप्पा संस्कृती मधील पूर्ण नागरीजीवन हे रावी नदी, सिंधू नदी, आणि सिंधू नदीच्या उपनद्या घागरा व सरस्वती या नद्यांच्या काठी वसलेले आढळून आले आहे. हडप्पा संस्कृतीचा कालखंड साधारणतः इ.स.पू. २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो. हडप्पा संस्कृतीचा उगम कसा झाला कुठून झाला याची स्थापना कोणी केली याबद्दल अजूनही माहिती उपलब्ध नाही. त्यावर आता पण शास्त्रज्ञांचे संशोधन सुरु आहे. तत्कालीन भारताच्या विविध ठिकाणी मिळालेल्या हडप्पा संस्कृतीची अवशेष, वस्तू व वास्तू व त्यांची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सारखीच आढळून येतात.

सिंधु संस्कृतीची भाषा व लिपीच्या अर्थाचा दुर्दैवाने अजूनही कोणीही पुरातत्त्वज्ञ उलगडा करू शकलेले नाही.यामुळे या लिपीतील चित्रांचा/चिन्हांचा अर्थ अजूनही अज्ञात आहे.सिंधू संस्कृतीकालीन लिपी ही चित्राक्षरलिपी होती.त्यात शेकडो वर्ण होते.या लिपीतील चित्रे किंवा चिन्हे म्हणजेच अक्षरे असत.या संस्कृतीच्या दुस-या टप्प्याच्या म्हणजेच नागरी सिंधू संस्कृती कालखंडात या चित्राक्षरलिपीचा वापर चालू झाला.विविध वस्तू,मुद्रा यांवर ही चित्रे/चिन्हे कोरलेली आढळून येतात.

मोहेंजोदडो आणि हडप्पा येथुन उदयास आलेली सिंधू संस्कृती आणि मेसोपोटेमियन संस्कृतीमधील मुख्य फरक असा होता की हडप्पा संस्कृतीवर व्यापाऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रभुत्व होते, तर मेसोपोटेमियाची सभ्यता राजघराण्याच्या अधीन होती. हडप्पा संस्कृती ही भारतीय उपखंडातील पहिली सभ्यता आहे जिला 'शहरी संस्कृती' होती. हडप्पा संस्कृती ही मातृसत्ताक समाजाची होती, जे स्त्री देवतांच्या मूर्तींच्या अस्तित्वावरून स्पष्ट होते.

याउलट, मेसोपोटेमियाची सभ्यता पितृसत्ताक होती, ज्यामुळे पुरुषांना अधिक महत्व मिळाले.सिंधू संस्कृतीला इतर संस्कृतींपेक्षा अनेक कारणांमुळे संशोधकांनी अधिक महत्त्व दिले आहे. त्यांच्या मते सिंधू संस्कृती सुमारे ५००० वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात होती आणि तिचे विस्तार क्षेत्र आजच्या पाकिस्तान, भारत आणि अफगाणिस्तानच्या काही भागांमध्ये होते. सिंधू संस्कृतीची शहरे, वास्तुकला, कला आणि तंत्रज्ञान यांचे अवशेष आजही सापडतात.

भरभराटीच्या शिखरावर असताना सिंधू संस्कृतीची लोकसंख्या पाच दशलक्षांपेक्षा जास्त असावी असे शास्त्रज्ञ मानतात. सिंधू शहरे त्यांच्या शहरी नियोजनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची भाजलेल्या विटांची घरे, विस्तृत ड्रेनेज सिस्टीम, पाणीपुरवठा यंत्रणा आणि मोठ्या, अनिवासी इमारतींच्या संकुलांसाठी देखील ते प्रसिद्ध आहेत.Dholavira

हडप्पा संस्कृतीची सुरवात इ.स. पूर्व ७००० म्हणजेच साधारण १० हजार वर्षांपूर्वी झाली. हडप्पा संस्कृतीसबंधीचा सगळ्यात जुना पुरावा बोलान पास जवळ असलेल्या मेहेरगड या ठिकाणातून मिळतो. ही संस्कृती इ.स. पूर्व २५०० च्या सुमारास विकासाच्या अगदी उच्च स्थानी पोहोचली होती. या हडप्पा संस्कृतीचा पसारा जवळजवळ १५ लाख स्क्वेअर किलोमीटर इतका म्हणजे आजच्या राजस्थानच्या पाचपट होता.

भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती. सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी १९२१ मध्ये उजेडात आणला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खनन झाले, त्यात सिंधू संस्कृतीचे ताम्रपाषाणयुगीन स्वरुप स्पष्ट झाले. राखालदास बॅनर्जी यांनी मोहें-जो-दडोचा शोध लावला (१९२२). यानंतर या दोन्ही स्थळी ⇨ सर जॉन मार्शल, इ. जे. एच्. मॅके, ⇨ माधोस्वरुप वत्स, ⇨ सर मॉर्टिमर व्हीलर इ. संशोधकांनी विस्तृत उत्खनने केली. याशिवाय सर्वेक्षणातील पाहणीत सिंध-पंजाबात (विद्यमान पाकिस्तान) सिंधू संस्कृतीची अनेक प्राचीन स्थळे उजेडात आली. सिंधूचे खोरे हेच या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे आगार असल्याने तिला सिंधू संस्कृती अथवा हडप्पा संस्कृती असे नाव देण्यात आले.

त्यानंतरच्या उत्खनन-संशोधनांत या संस्कृतीच्या व्याप्तीबद्दलच्या कल्पनांत आमूलाग्र बदल झालेले आहेत. प्रारंभी पंजाबात ⇨ रुपड पासून ते पश्चिमेस बलुचिस्तानातील ⇨ सुक्तगेनडोर एवढ्या विभागात या संस्कृतीच्या अवशेषांची लहानमोठी सु. ६० व दक्षिणेस पश्चिम किनाऱ्यालगत सौराष्ट्रात सु. ४० स्थळे ज्ञात झाली होती; मात्र आजमितीला सिंधू संस्कृतीच्या दोन हजारांहून अधिक स्थळांचा शोध लागला आहे. त्यांपैकी सु. १५०० भारतात आणि सु. ५०० पाकिस्तानात आहेत.

विशेष म्हणजे त्यातील बहुसंख्य – सहाशेहून अधिक – हरयाणा –राजस्थानमधील सरस्वतीच्या (सांप्रत घग्गर) खोऱ्यात आहेत. गुजरातेत ⇨ लोथल व त्याच्या दक्षिणेस भगतराव येथेही सिंधू संस्कृतीचे लोक राहत असत, शिवाय राजस्थानात ⇨ कालिबंगा, गिलुंड व इतर अनेक ठिकाणी तसेच उत्तर प्रदेशात मीरतच्या पश्चिमेस सु. ३१ किमी. वर अलमगीरपूर येथे सिंधू संस्कृतीचे लोक राहत असत, असे आढळून आले आहे.

भगतराव मोहें-जो-दडोपासून आग्नेयीस सु. ८०५ किमी. वर आहे;सुक्तगेनडोर कराचीपासून पश्चिमेस सु. ४८३ किमी. वर आहे आणि अलमगीरपूर मोहें-जो-दडोच्या पूर्वेस सु. ९६६ किमी. वर आहे. हरयाणा आणि पंजाबात बनवाली, मिताथल या स्थळांशिवाय सिंधमध्ये यारी या ठिकाणी सिंधू संस्कृतिसदृश अवशेष मिळाले. यावरुन सिंधू संस्कृतीची व्याप्ती किती विस्तृत होती, याची कल्पना येते.

व्याप्तीइतकीच या संस्कृतीची प्राचीनताही लक्षात ठेवण्यासारखी आहे. या संस्कृतीच्या ⇨ कोटदिजी, हडप्पा, लोथल इ. स्थळांचा कालखंड कार्बन-१४ पद्घतीनुसार निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार आणि मोहें-जो-दडो व हडप्पा येथे सापडलेल्या काही अवशेषांच्या व मध्यपूर्वेतील — विशेषतः मेसोपोटेमियातील - अव-शेषांच्या तुलनात्मक अभ्यासानुसार तसेच आतापर्यंत झालेल्या उत्खननांवरुन सिंधु संस्कृतीचे स्थूलमानाने तीन कालखंड पडतात :

(१) आद्य सिंधू (इ. स. पू. ३२०० – २६००),

(२) नागरी सिंधू (इ. स. पूर्व २६०० – २०००) आणि

(३) उत्तर सिंधू (इ. स. पूर्व २०००–१५००).Lothal: The Forgotten City of the Dead

आद्य सिंधु कालखंडातील स्थळे सिंधपासून सरस्वतीच्या खोऱ्यात अधिक आहेत. नागरी सिंधू काळातील सर्वंकष पुराव्याचा विचार करता या काळात वेगाने सांस्कृतिक बदल घडून आले; तर उत्तर सिंधू काळात सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासास सुरुवात झाली.

या संस्कृतीचा उगम, उत्क्रम व अस्त कसा झाला, यांबाबत विद्वानांत एकमत नाही; परंतु इ. स. पू. तिसऱ्या सहस्रकामध्ये सिंध-पंजाबची मैदाने आणि त्यांच्या पश्चिमेकडच्या अफगाणिस्तान, बलुचिस्तान भागांतील डोंगराळ प्रदेशातही सध्यापेक्षा मानवी वस्तीला जास्त अनुकूल अशी नैसर्गिक परिस्थिती असावी, यात शंका नाही.

बलुचिस्तानच्या डोंगराळ भागात छोटीछोटी ग्रामवस्तीची केंद्रे होती, हे आता सर्वमान्य झाले आहे. बलुचिस्तान आणि उत्तर पाकिस्तान या विभागात क्वेट्टा, नाल, आमरी, झोब,कुली आणि टोगो इ. प्रादेशिक वैशिष्ट्यांच्या निरनिराळ्या ग्रामसंस्कृती अस्तित्वात होत्या, याबद्दल पुरावा मिळालेला आहे. या संस्कृतीचे लोक विविध तऱ्हेची रंगविलेली मातीची भांडी वापरीत असत. कालखंडाच्या दृष्टीनेही या संस्कृती हडप्पा संस्कृतीच्या आधीच्या होत्या, हे आता निश्चित झाले आहे.

या विभागातील उत्तरेकडील संस्कृतीत प्रामुख्याने लाल खापरांचा वापर आढळतो, तर दक्षिण विभागामध्ये पिवळसर रंगाची खापरे प्रचलित होती, असे दिसते. मृत्पात्रे, मानवी दफने, मृत्पात्रांवरील रंगीत नक्षीकाम आणि काही स्थळी सूचित केले जाणारे संभाव्य धान्योत्पादन, यांवरुन सिंधू संस्कृतीच्या नागरी विकासाचा आणि या ग्रामीण संस्कृतींचा घनिष्ठ संबंध असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. हडप्पाच्या उत्खननामध्ये यास थोडाफार दुजोरा मिळालेला आहे.Harappan civilization: ASI digs up millennia-old planned city in Haryanas  Rakhigarhi, check details | India News | Zee News

हडप्पाच्या कोटविभागाच्या उत्खननात सिंधू संस्कृतीच्या खापरांच्या थरांच्या खाली झोब संस्कृतीची खापरे मिळालेली आहेत. त्याचप्रमाणे पाकिस्तानातील कोटदिजी येथील उत्खननामध्ये हडप्पापूर्व संस्कृतीचे अवशेष सापडले. या हडप्पापूर्व संस्कृतीत तांब्याचा वापर नव्हता आणि भाजलेल्या विटांचाही अभाव होता. या काळातील मृत्पात्रे तांबड्या रंगाची आणि काळ्या रंगात नक्षी केलेली असली,तरी त्यांचे आमरी येथे सापडलेल्या खापरांशी साधर्म्य लक्षात येण्यासारखे आहे. कार्बन-१४ च्या आधारेही कोटदिजीच्या वस्त्यांची प्राचीनता इ. स. पू. २७०० म्हणजेच हडप्पा संस्कृतिपूर्व असलेली दिसून येते.

नंतरच्या थरांमध्ये आणि काही समकालीन थरांमध्ये हडप्पा संस्कृतीमध्ये सापडणाऱ्या नक्षीसारखी नक्षी असलेली खापरे आणि बहुधा घराच्या भिंतीवर चिकटविण्याकरिता वापरण्यात येणारे भाजलेल्या मातीचे त्रिकोण हडप्पा आणि कोटदिजी या दोन्ही ठिकाणी उपलब्ध झाल्याने या दोन्ही संस्कृतींचा संबंध घनिष्ठ असला पाहिजे, असे दिसून येते. राजस्थानातही कालिबंगा आणि सोथी या ठिकाणी सिंधू संस्कृतिपूर्व वस्त्यांचे अवशेष अलीकडेच मिळालेले आहेत; परंतु विशेष म्हणजे, कालिबंगा येथे सिंधू संस्कृतीचे आणि सोथी संस्कृतीचे लोक एकत्र राहत होते, यामध्ये काहीही संदेह राहिलेला नाही.Mystery Behind the Decay of Indus Valley Civilization – Vasudhaiva  Kutumbakam

हडप्पा संस्कृतीतील शहरं म्हणजे छोट्या छोट्या गावांचा समूह होता. अशा छोट्या भागांचे एकमेकांशी संबंध होते. सुरवातीला लोकसंख्या खूप नव्हती. १-२ माणसे पर स्क्वेअर किलोमीटर एव्हडीच! हडप्पा संस्कृती ही शांतताप्रिय म्हणून ओळखली जाते कारण संस्कृतीतील कोणत्याही भागातून मोठ्या प्रमाणात(युद्धाप्रसंगावेळी लागतील एवढी) शस्त्रे मिळालेली नाहीत.

multi-grain-ladoos-from-harappa-civilization-excavated-from-harappan-site

हडप्पा संस्कृतीतील लिपी अजूनतरी कोणीही यशस्वीरीत्या वाचू शकली नाहीये. हडप्पा संस्कृतीत राजेशाही पद्धत होती का लोकशाही होती यासंदर्भातही काही पुरावे मिळालेले नाहीत. हडप्पा सभ्यतेतून मोठ्या प्रमाणात प्राण्यांच्या, स्त्रियांच्या मुर्त्या मिळालेल्या आहेत. परंतु सभ्यतेतून कोणत्याही वैदिक किंवा हिंदू धर्मीकतेसंबंधी एकही ठोस पुरावा मिळालेला नाही. हडप्पा संस्कृतीचा भारतातील व आशियातील इतर संस्कृतींशी व्यापार चालू असल्याचे पुरावे आज मिळतात.

हडप्पा संस्कृतीच्या दरम्यान भारतीय उपखंडात इतरही संस्कृत्या(वसाहती) होत्या. पण त्यापैकी हडप्पा सभ्यता तिच्या काही वैशिष्ठ्यांमुळे ओळखली जाते.

वैशिष्टये -

लेखी साहित्य - शिक्के

दागिने व मणी

१ × २ × ४ आकाराच्या विटा

पाण्याचे व्यवस्थापन

नियोजित शहरे

वेगळ्या दफन पद्धती

प्रमाणित वजने

लाल व काळ्या रंगाची पॉटरी

टेराकोटा खेळणी

कापूस, बार्ली आणि गव्हाचा उपयोग.Indus Valley Civilization: Startling facts you should know | Justice Mirror

हडप्पा संस्कृतीचा कार्यकाळ -

इ.स. पूर्व ७००० - पहिली शेती

इ.स. पूर्व ४००० - पहिले मोठे शहर

इ.स. पूर्व ३७०० - सामूहिक लहान-मोठ्या शहरांचे पुरावे.

इ.स. पूर्व २००० - सभ्यता उच्च स्थानी

इ.स. पूर्व १६०० - सभ्यतेचा लोप.Harappan Civilization Art, Architecture, Decline

हडप्पा संस्कृती लोप पावण्याची कारणे पुढील प्रमाणे असू शकतात -

वातावरणात अचानक झालेला बदल.

राहणीमानात बदल करण्यासाठी लागण्याऱ्या नवीन तंत्रज्ञान किंवा विचारसरणीची कमतरता.

वाढलेली लोकसंख्या आणि त्यामुळे उद्भवलेली वाईट परिस्थिती.

Harappans changed crops to suit climate change: Study | Mumbai news -  Hindustan Times

 

हेही वाचा