मोले बाजारातून पोलिसांकडून २६ लीटर बेवारस स्थितीतील दारू जप्त

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
05th May, 01:44 pm
मोले बाजारातून  पोलिसांकडून २६ लीटर बेवारस स्थितीतील दारू जप्त

फोंडा : मोले येथे बाजारात शनिवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञातानी बेवारस स्थितीत ठेवलेली विविध प्रकारची दारू कुळे पोलिसांनी जप्त केली. अंदाजे २६ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत ६,३५५ रुपये आहे. Over 85 lakh litres of liquor seized from all five states that went to  polls: EC - Hindustan Times

प्राप्त माहितीनुसार शनिवारी रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना  बाजारात एक बॅग बेवारस स्थितीत आढळून आली. बॅगेत तपासणी केली असता पोलिसांना २६ लिटर दारू आढळून आली. निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. जप्त करण्यात आलेली दारू सांगे अबकारी खात्याच्या अधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आली.

हेही वाचा