पॅन इंडिया स्टार आर. माधवन; जाणून घ्या एकूण संपत्ती

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
21st March 2024, 10:19 pm
पॅन इंडिया स्टार आर. माधवन; जाणून घ्या एकूण संपत्ती

अभिनेता आर. माधवन हा एक असा कलाकार आहे ज्याचे दक्षिण तसेच हिंदी पट्ट्यात प्रचंड चाहते आहेत. तो दरवर्षी १ जून रोजी आपला वाढदिवस साजरा करतो. मोठ्या पडद्याशिवाय तो टीव्ही मालिकांमध्येही दिसला आहे. त्याने चाहत्यांच्या प्रेमासोबतच भरपूर आर्थिक कमाईही केली आहे.

झारखंडमध्ये जन्मलेल्या माधवनला सुरुवातीपासूनच अभिनयाच्या जगात येण्याची इच्छा होती. मुंबईच्या केसी कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्याने आपले संपूर्ण लक्ष अभिनयाकडे केंद्रित केले. 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या माधवनने आपल्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत अनेक संस्मरणीय सिनेमे दिले आहेत.


एवढी आहे माधवनची संपत्ती

२००१ मध्ये आलेल्या 'रेहना है तेरे दिल में' या हिंदी चित्रपटामुळे आर. माधवन खूप लोकप्रिय झाला. या चित्रपटामुळे त्याची प्रतिमा चॉकलेट बॉय अशी झाली. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. दक्षिण आणि हिंदी चित्रपटांसह अनेक वेब सीरिजमध्ये दिसलेला माधवन सुमारे १०३ कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची बहुतेक कमाई चित्रपट आणि जाहिरातींमधून येते. एका चित्रपटासाठी तो सहा ते सात कोटी रुपये घेतो. याशिवाय तो चित्रपटांच्या कमाईतून नफ्यातही वाटा उचलतो.


घराची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये

माधवनची देशभरात अनेक घरे आहेत. या आलिशान घरांची किंमत करोडोंमध्ये आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याच्या चेन्नईतील घराची किंमत १८ कोटी रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे मुंबईत एक आलिशान अपार्टमेंटही आहे. मुंबईतील या घराला पारंपरिक आणि आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न माधवनने केला आहे.


लक्झरी कारचा शौकीन

अभिनयासोबतच माधवनला गाड्यांचाही शौक आहे. त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. त्याच्याकडे बीएमड्ल्यू, ऑडी, रेंज रोव्हरसारख्या गाड्या आहेत. कारशिवाय तो बाईकचाही शौकीन आहे. त्याच्याकडे बीएमड्ल्यू के १५०० जीटीएल बाईक आहे ज्याची किंमत २४ लाख रुपये आहे. याशिवाय त्याच्या बाईक कलेक्शनमध्ये डुकाटी डायवेल आणि यामाहा व्ही-मॅक्स देखील आहेत.

हेही वाचा